तेल्हारा : आगामी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने काही ग्रामीण भागातील मतदारांचे नावे शहरात नोंदविण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे दोन मतदारयादीत नाव नोंदवून नियमांचे उल्लंघन करणार नाही या दृष्टीने दुहेरी मतदानाचा दुरुपयोग टाळण्यासाठी उपाययोजना कराव्या, अशी मागणी तेल्हारा विकास मंचने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. तेल्हारा विकास मंचने दिलेल्या निवेदनानुसार, आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी काही व्यक्ती ग्रामीण भागातील बहुतांश मतदारांची नावे शहरातील काही भागांमध्ये नोंदविणार असल्याची शक्यता आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी पारदर्शक व्हावी, यासाठी जे मतदार शहरांमध्ये राहतात, त्यांचीच नावे मतदार यादीत असणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील मतदारांची नावे शहरांमध्ये काही जणांनी नोंदविली असल्यास त्यांच्यावर कारवाई करून नावे वगळण्यात यावी, तसेच सर्व बाबींची चौकशी करूनच अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात यावी, अशी मागणी तेल्हारा विकास मंचने निवेदनातून केल्या आहेत. निवेदन देताना तेल्हारा विकास मंचचे अध्यक्ष रामभाऊ फाटकर, युवक आघाडी अध्यक्ष सोनू सोनटक्के, स्वप्निल सुरे, गौरव धुळे, मोहन श्रीवास, संतोष राठी, शेख ताजुद्दीन, मंगेश मामानकर, सोनू गाडगे, विजय इंगळे, सुनील फाटकर, आकाश बावणे, लखन मामनकार, वैभव मानकर, नीलेश धारपवार, अक्षय ठाकूर, आदी उपस्थित होते. -------------------- मतदारांनी ग्रामीण भागात व शहरी भागात अशा दोन ठिकाणी नाव नोंदविले असल्यास व ते निदर्शनास आल्यास या सर्व गोष्टींची पडताळणी करून मतदारांची नियमानुसार एकाच ठिकाणी नोंद केली जाणार आहे. - डॉ. संतोष येवलीकर, तहसीलदार तेल्हारा.
दुहेरी मतदानाचा दुरुपयोग टाळण्यासाठी उपाययोजना करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 4:18 AM