लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत सुरू असलेली तूर खरेदी ३१ ऑगस्टपर्यंत केली जात आहे. त्याचवेळी टोकन घेतलेले अनेक शेतकरी खरेदी केंद्रावर आलेले नाही. त्यामुळे टोकन घेतलेल्या सर्व शेतकर्यांनी १९ ऑगस्ट रोजी संबंधित कृषी बाजार समितीमध्ये उपस्थित राहून नोंद न केल्यास त्यांचे टोकन रद्द करण्याचा इशारा जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिला आहे. बाजार समिती परिसर आणि घरी तूर पडून असलेल्या शेतकर्यांना विक्रीसाठी टोकन देण्यात आले आहे. त्या शेतकर्यांची तूर खरेदी सर्व केंद्रामध्ये सुरू आहे; मात्र काही केंद्रावर टोकन घेतलेले शेतकरी येत नसल्याचा प्रकार उघड होत आहे. त्यामुळे दैनंदिन नियोजन केल्याप्रमाणे खरेदी करणे शक्य नाही. शेतकरी केंद्रांवर येत नसल्यास त्यांनी तूर इतरत्र विक्री केली किंवा शासनाला देण्यास ते इच्छुक नाहीत. त्यातच ३१ ऑगस्टपर्यंत तूर खरेदी पूर्ण करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. त्यामुळे बाजार समितीमधून टोकन घेतलेले शेतकरी आहेत की नाहीत, घरी तूर असलेल्यांना विक्री करावयाची आहे की नाही, ही बाब पडताळून पाहिली जाणार आहे. त्यासाठी शेतकर्यांना १९ ऑगस्ट रोजी बाजार समितीमध्ये उपस्थित राहून नोंद करणे आवश्यक करण्यात आले. त्या दिवशी उपस्थित राहणार्या शेतकर्यांचा तूर खरेदी दिवस निश्चित करण्याचे आदेश कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांना देण्यात आले. बाजार समितीमध्ये येताना शेतकर्यांनी सात-बारा, टोकन, पंचनाम्याची प्रत तसेच इतर आवश्यक कागदपत्रे आणण्याचे आवाहन करण्यात आले. त्या दिवशी बाजार समितीमध्ये नोंद न करणार्या शेतकर्यांचे विक्री टोकन रद्द केले जाणार आहे.
शेतकरी न आल्यास तूर विक्रीचे टोकन रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 1:43 AM
अकोला : शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत सुरू असलेली तूर खरेदी ३१ ऑगस्टपर्यंत केली जात आहे. त्याचवेळी टोकन घेतलेले अनेक शेतकरी खरेदी केंद्रावर आलेले नाही. त्यामुळे टोकन घेतलेल्या सर्व शेतकर्यांनी १९ ऑगस्ट रोजी संबंधित कृषी बाजार समितीमध्ये उपस्थित राहून नोंद न केल्यास त्यांचे टोकन रद्द करण्याचा इशारा जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिला आहे.
ठळक मुद्दे१९ ऑगस्ट रोजी कृउबासमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहनउपस्थित राहून नोंद न केल्यास त्यांचे टोकन रद्द करण्याचा इशारा