सांजा निपाणाअंतर्गत येत असलेल्या महसूल विभागाचा मुख्य दुवा असलेला कर्मचारी तलाठी आहे ग्राम स्तरावरच्या शेतकऱ्यांना शेती संबंधित कागदपत्र जसे सात बारा, आठ अ, फेरफार, तलाठी अहवाल, भूमिहीन, शेतमजूर, मार्चअखेर असल्याने परिसरातील शेतकरी यांना पीक कर्जासाठी तलाठ्यांकडून शेतीविषयक कागदपत्रे सदरच्या बँकसाठी आवश्यक आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सांजासाठी असलेल्या महसूल विभागाचे कर्मचारी तलाठी हे शेतकऱ्यांना दिसलेच नाही. त्यामुळे त्यांच्या कडून कागदपत्र कोठून घ्यावे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला. सतत गायब असलेल्या तलाठ्याला अभय कोणाचे, अशी चर्चा आता सर्वसामान्य जनतेत आहे. दुसरीकडे निपाणा सांजाचा तलाठी दाखवा बक्षीस मिळवा, अशी शोधमोहीम राबवण्यासाठी परिसरात स्वाक्षरी अभियान राबवण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती आहे.