अकोला: पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यातील धरणात केवळ १८ टक्के जलसाठा शिल्लक असून, टंचाईने उग्ररू प धारण केले आहे. एकट्या बुलडाणा जिल्ह्यात १०० हून अधिक टॅँकर सुरू करण्यात आली असून, अकोला जिल्ह्यात ९ ट्रक पाण्यासाठी अधिग्रहित करण्यात आली आहेत.वºहाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यात लघू, मध्यम व मोठे मिळून ५०२ सिंचन प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये आजमितीस केवळ १८ टक्केच साठा उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील स्थिती भीषण आहे. या जिल्ह्यातील एक मोठा व तीन मध्यम प्रकल्पातील साठा संपला असून, पेणटाकळीत ०.७३ तर तोरणा प्रकल्पात १.२७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला जिल्ह्यातील घुंगशी धरणाचा साठा शून्य असून, निर्गुणा प्रकल्पात केवळ ३.०५ टक्के साठा उपलब्ध आहे. वाशिम जिल्ह्यातील सोनल प्रकल्पाचा साठा ०.८९ टक्केच आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा या मोठ्या धरणातही केवळ ९.९७ टक्केच साठा असून, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १०.३७, पलढग १३.५८,मन १८.११, तर उतावळी प्रकल्पात २४.०५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा मोठ्या धरणात २०.४७,वान ४०.७७, मोर्णा १५.८५, उमा प्रकल्पात ६.३४ टक्के जलसाठा आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाण प्रकल्पात १७.३२, एकबुर्जीमध्ये २१.७५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणात केवळ २० टक्के साठा असून, यवतमाळच्या पूस प्रकल्पात ३३.३२, अरुणावती १९.९३, बेबळामध्ये २३.८५ टक्के जलसाठा शिल्लक आहे.पाच जिल्ह्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील स्थिती विदारक आहे. मागच्या वर्षीचा पाऊस कमी झाल्याने या जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये अल्प जलसाठा संचयित झाला होता. इतर चारही जिल्ह्याची स्थिती नाजूक आहे.