अकोला, दि. ५- महापालिकेच्या मालमत्ता कर वसुली विभागाने चालू आर्थिक वर्षात ३३ कोटींच्या मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवले होते. यापैकी १३ कोटी रुपये वसूल झाले असले, तरी उर्वरित २0 कोटी रुपये वसूल करण्यासाठी मनपासमोर २६ दिवसांचा अवधी शिल्लक आहे. मनपा कर्मचार्यांच्या थकीत वेतनाची समस्या लक्षात घेता प्रशासनाला टॅक्स वसुलीसाठी अथक परिश्रम घ्यावे लागणार असल्याचे चित्र आहे. महापालिकेकडे जमा केल्या जाणार्या मालमत्ता कराच्या बदल्यात प्रशासनाकडून मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. पथदिवे, पाणीपुरवठा, साफसफाई, रस्ते-नाल्या आदी सुविधांचा यामध्ये समावेश आहे. मार्च महिना संपेपर्यंंंंत अकोलेकर मालमत्ता कर जमा करीत नसल्याचे दिसून येते. त्याचा परिणाम मूलभूत सोयी-सुविधांवर होतो. चालू आर्थिक वर्षात प्रशासनाला अकोलेकरांच्या खिशातून तब्बल ३३ कोटी रुपये मालमत्ता व पाणीपट्टी कर वसूल करायचा आहे. नोटाबंदीच्या कालावधीत जुन्या नोटांच्या बदल्यात मालमत्ता कर जमा करणार्यांची मोठी संख्या होती. त्यावेळी १३ कोटी रुपये मनपाच्या तिजोरीत जमा झाले. उर्वरित २0 कोटी रुपये वसूल करण्यासाठी मनपाकडे अवघे २६ दिवस उरले आहेत. थकीत वेतनाची समस्यामनपा कर्मचार्यांचे पाच महिन्यांचे वेतन थकीत आहे. ही रक्कम ३0 कोटींपेक्षा जास्त होते. अर्थातच, थकीत वेतनाची समस्या दूर करायची असेल, तर प्रशासनाला मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे लागणार आहे. वसुलीत पूर्व झोन अग्रेसरनोटाबंदीच्या कालावधीत सर्वाधिक मालमत्ता कर पूर्व झोनमधून जमा झाला. ही रक्कम आठ कोटींपेक्षा जास्त असल्याची माहिती आहे.
उद्दिष्ट ३३ कोटींचे, लक्ष्य २0 कोटी रुपये!
By admin | Published: March 06, 2017 2:03 AM