अकोला अकाेल्यातील काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, लाॅकडाऊनच्या उपाययाेजनांसाेबतच लसीकरणाचा वेग वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळेच साेमवारी पालकमंत्री बच्चू कडू यांनी व्यापाऱ्यांचे लसीकरण करण्याचे निर्देश दिले. अवघ्या एका आठवडयात तब्बल ६० हजार व्यापाऱ्यांसह कामगारांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट पालकमंत्र्यांनी दिले. मात्र, प्रत्यक्षात केवळ २५ हजार लसींचाच साठा उपलब्ध असल्याने, प्रशासनातील समन्वयाचा अभाव प्रकर्षाने जाणवला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियाेजन भवन येथे साेमवारी पालकमंत्री बच्चू कडू यांनी काेराेना उपाययाेजनांचा आढावा घेतला. यावेळी आमदार अमाेल मिटकरी, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी साैरभ कटियार, महापालीका आयुक्त निमा अराेरा, अतिरिक्त पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी प्रा.संजय खडसे, जिल्हा शल्य चिकित्सक राजकुमार चव्हाण यांचेसह आराेग्य विभागाचे अधिकारी उपस्थित हाेते. केंद्र शासनाने ४५ वर्षांवरील सर्वांना लस देण्याबाबत सूचना दिल्या असल्याने व्यापाऱ्यांचे लसीकरण प्राधान्याने करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. लसीकरणासाठी किराणा, भाजीपाला, फळ, औषधी, दूध िवक्रेते अशा पद्धतीने प्राधान्यक्रम निश्चित करा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी लसींच्या साठ्याबाबत जिल्हा समन्वय डाॅ.मनीष शर्मा यांनी उपलब्ध साठा आणि नगरपालिकांना केलेल्या पुरवठ्याबाबत माहिती दिली काेविन ॲपवर १४ हजार साठा अकाेल्यात असल्याचे दाखवत असले, तरी प्रत्यक्षात ३ हजारच डाेस उपलब्ध असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले. त्यामुळे शहरात लसींचा साठा कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लसीकरणाचे उद्दिष्ट ६० हजार साठा मात्र २५ हजारांचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 4:18 AM