शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
4
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
5
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
6
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
7
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
8
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
9
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
10
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
11
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
12
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
13
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
14
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
15
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
16
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
17
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
18
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
19
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
20
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण

विश्वशांतीचा संदेश देणारे ‘नि:शस्त्र योद्धा’ तथागत गौतम बुद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 2:58 PM

महापुरुषांच्या जीवनात दोनच गोष्टी संभवतात. त्या म्हणजे एक तर चक्रवर्ती राजा किंवा सम्यक संबुद्ध होईल, असे तथागत गौतम बुद्धांच्या जीवनातील प्रसंगाचे सुरेख दर्शन ‘नि:शस्त्र योद्धा’ या नाटकातून करण्यात आले.

अकोला: तथागत गौतम बुद्धांच्या जीवनातील अहिंसा तत्त्वावर आधारित जगाच्या कल्याणासाठी शांततेचा संदेश देणारे योद्धा, शुद्धोधन राजाच्या पोटी जन्माला येऊन ३२ लक्षणांनी युक्त असल्याचे असितमुनी त्यांच्याकडे पाहून भविष्य वर्तवितात. इतकेच नाही, तर अशा महापुरुषांच्या जीवनात दोनच गोष्टी संभवतात. त्या म्हणजे एक तर चक्रवर्ती राजा किंवा सम्यक संबुद्ध होईल, असे तथागत गौतम बुद्धांच्या जीवनातील प्रसंगाचे सुरेख दर्शन ‘नि:शस्त्र योद्धा’ या नाटकातून करण्यात आले.बुलडाण्याच्या विश्वमित्र सांस्कृतिक संस्थेने ५८ व्या महाराष्ट्र राज्य मराठी हौशी नाट्य स्पर्धेतील अकोला विभागातील प्राथमिक फेरीतील अंतिम नाटक गुरुवारी सादर केले. या प्रायोगिक नाटकाचे लेखन रोहित पगारे यांनी तर दिग्दर्शन जयंत दलाल यांनी अतिशय सुंदर केले. राजा शुद्धोधनाची भूमिका अतुल मेहकरकर यांनी साकारली. असित मुनी-शैलेश बनसोड, मारिचा-अर्चना जाधव, मारा-पराग काचकुरे, षड्रा- पूजा शिरसोले, तथागत गौतम बुद्ध- योगेश जाधव, यशोधरा- संजीवनी बोराडे, राहुल- अथर्व जाधव, सैनिक ांची भूमिका आशिष मोहरिर, प्रतीक शेजोळ यांनी उत्तमपणे साकारली. प्रकाश योजना लक्ष्मीकांत गोंदकर, नेपथ्य पवन बाबरेकर, संगीत विजय सोनोने, वेशभूषा अंजली परांजपे, रंजना बोरीकर, रंगभूषा अनिकेत गायकवाड, चेतन भोळे यांची होती. रंगमंच व्यवस्था दिनेश उजाडे, श्रीराम पुराणिक, सहकार्य रवींद्र इंगळे, गणेश देशमुख, योगेश बांगडभट्टी, जितेंद्र जैन, कुलदीप शेजोळ, विजय परसने, कुणाल खर्चे व अभिलाष चौबे यांचे लाभले.ज्येष्ठ रंगकर्मी राम जाधव यांचा सत्कारअखिल भारतीय नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष राम जाधव यांच्या सत्कार स्पर्धेचे परीक्षक डॉ. शशिकांत चौधरी कोल्हापूर, प्रतिभा पाटील मुंबई आणि राजेंद्र जोशी औरंगाबाद यांच्या हस्ते करण्यात आला. मालती भोंडे यांनीदेखील राम जाधव यांचा सत्कार केला. त्यावेळी परीक्षक राजेंद्र जोशी आणि राम जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. जाधव म्हणाले, की स्पर्धा ही कलावंतांसाठी दिवाळी असते. तीन-चार महिन्यांचे त्यामागे परिश्रम असतात. नाटक ही सातत्याने होणारी प्रक्रिया आहे. कारण येथे थांबायला कोणालाच वाव नसतो. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत जामदार यांनी केले.स्पर्धेचा निकाल सोमवारीनाट्य स्पर्धेचा निकाल मुंबईला सोमवारी जाहीर होण्याची शक्यता यावेळी परीक्षकांनी व्यक्त केली. अकोला केंद्रावर झालेली नाटके चांगली होती, तसेच निकालामध्ये पारदर्शकता राहील, अशी ग्वाही परीक्षकांनी दिली. 

 

टॅग्स :Akolaअकोलाcultureसांस्कृतिक