संजय खांडेकर अकोला, दि. २- अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयातील २८ डॉक्टर आणि ३२८ वैद्यकीय कर्मचार्यांचा तब्बल चार वर्षांंच्या ह्यटीडीएसह्णचा घोळ अजूनही कायम आहे. ३१ मार्चपर्यंंत हिशेब जुळवाजुळव करण्याचा शब्द जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या प्रशासनाने दिला होता. मात्र, आठ वर्षांंतील दस्ताऐवज न मिळाल्याने आयकर विभागाकडे जिल्हा स्त्री रुग्णालयाची यंत्रणा फिरकलेली नाही. त्यामुळे आयकर विभागाच्या ह्यसीपीसीह्णतर्फे शेकडो कर्मचारी आणि अधिकार्यांना पुन्हा नोटिसेस बजावल्या जात आहेत.अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयातील २0 नियमित वैद्यकीय अधिकारी, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत एसएनसीयू विभागातील आठ कंत्राटी वैद्यकीय अधिकारी आणि ३00 कर्मचार्यांचा तब्बल आठ वर्षांंचा टीडीएस गहाळ झाला आहे. त्यामुळे येथील शेकडो अधिकार्यांना नोटिस बजाविल्या जात आहेत. २00९ पासून २0१७ पर्यंंतच्या ५0 लाखांच्यावरील टीडीएस कपातीची आकडेवारी जुळलेली नाही. अकोला आयकर विभागाने वैद्यकीय अधिकार्यांना व्यक्तीश: आणि जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. कुलवाल यांना नोटिस बजाविली आहे. ३१ मार्चपूर्वी हा हिशेब जुळविण्याचे सांगितले होते. मात्र, अजूनही स्त्री रुग्णालयाच्या प्रशासनाला त्यात यश आलेले नाही. सात वर्षांंपर्यंंत प्रकरण शिथिल ठेवण्याचे अधिकार आयकर विभागाला आहे. या प्रकरणात आठ वर्ष झाल्याने यामध्ये दंडात्मक कारवाई होण्याचे संकेत स्पष्ट होत आहे.जिल्हा स्त्री रुग्णालयातील नियमित वैद्यकीय अधिकार्यांना ८0 हजार ते एक लाख रुपयांपर्यंंत वेतन आहे. कंत्राटी वैद्यकीय अधिकार्यांना ४0 ते ६0 हजार रुपये मानधन आणि अधिकारी-कर्मचारी असलेल्या विविध विभागातील ३00 कर्मचार्यांना विविध पदानुसार वेतन दिले जाते. एकंदरित ३२८ अधिकारी-कर्मचार्यांच्या वेतनातून २00९ पासून दरमहा नियमित टीडीएस कापला गेला. जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आस्थापना विभागाकडून नियमानुसार ही कपात होत असली, तरी ती रक्कम अजूनही आयकर विभागाच्या खात्यात दिसलेली नाही. त्यामुळे आयकर विभागाने डॉक्टर आणि अधिकारी यांना टीडीएस न भरल्याची नोटिस बजाविली आहे. गेल्या आठ वर्षांंचा कपात झालेला टीडीएस गेला कुठे, असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे. पगार बिलातून टीडीएसची कपात नियमित झाली असून, त्याचा भरणादेखील ट्रेझरीत केला गेला आहे. मॅन्युअली नोंदीत पॅन कार्ड क्रमांक चुकल्याने आणि कपात केलेला टीडीएसचा हप्ता ठरावीक वेळेच्या आत न भरल्याने हा घोळ झाला. दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे -डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.
स्त्री रुग्णालयाच्या ३२८ कर्मचा-यांच्या ‘टीडीएस’चा घोळ कायम
By admin | Published: April 03, 2017 3:02 AM