अकोला : जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या समस्या मुख्य कार्यकारी अधिकार्याकडे मांडण्यासाठी आलेल्या दोन संघटनांच्या पदाधिकार्यांची त्यांच्या कक्षासमोरच आपसात हाणामारी झाली.सोमवारी दुपारी हा प्रकार घडला. प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्या मुख्य कार्यकारी अधिकारी विधळे यांच्यासमक्ष मांडण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षकांच्या समन्वय समितीचे पदाधिकारी सोमवारी दुपारी जमले. यावेळी दोनशेपेक्षाहीअधिक शिक्षक उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जमिरउल्लाखॉ पठाण यांच्यासह काही मोजके शिक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी कक्षात गेले. त्यावेळी कक्षालगतच्या परिसरात चांगलीच गर्दी झाली होती. त्यातच महाराष्ट्र राज्य अपंग माध्यमिक शिक्षक संघटनेचे जावेद इकबाल यांनी काहीतरी बोलत शिवीगाळ केल्याचे प्रत्यक्षदश्रींचे म्हणणे आहे. त्यावेळी महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे मो. आबेद यांनी त्यांना अधिकार्यांचा कक्षात तसे बोलू नका, असे म्हटले. त्यावरून वाद वाढल्याने दोघांनीही एकमेकांना मारहाण केल्याची घटना घडली. त्यामध्ये जावेद इकबाल यांच्या चेहर्याला इजा होऊन रक्तस्त्राव झाला. याप्रकरणी त्यांनी सिटी कोतवाली पोलिसात मारहाणीची तक्रार केली आहे. त्यांच्यावर सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हे दाखल झाले नव्हते.
सीईओंच्या कक्षासमोरच शिक्षकांची हाणामारी !
By admin | Published: March 20, 2017 9:00 PM