अकोला : मुंबई येथील होमी भाभा विज्ञान केंद्र, राज्य विज्ञान शिक्षण संस्था (नागपूर), अमरावती विभागीय विज्ञान अध्यापक मंडळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालय, अकोला एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ११ व्या विभागीय विज्ञान प्रदर्शन कार्यशाळेचे आयोजन सोमवार, २६ ऑक्टोबर रोजी न्यू इंग्लिश हायस्कूल येथे करण्यात आले आहे. कार्यशाळेत विज्ञान शिक्षकांना प्रदर्शनासाठी विज्ञान प्रतिकृतींबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ४१ व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या अनुषंगाने १ ते ३0 नोव्हेंबर या कालावधीत तालुकास्तरीय, तर १ ते १५ डिसेंबर या कालावधीत जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे विज्ञान प्रदर्शन इयत्ता सहावी ते आठवी आणि इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. विज्ञान प्रदर्शनासाठी भारत सरकारच्या एनसीईआरटी यांच्या निर्देशान्वये ह्यसमावेशित विकासासाठी विज्ञान व गणितह्ण या विषयाची निवड करण्यात आली आहे. या मुख्य विषयाला अनुसरून ह्यआरोग्य, पोषण आणि स्वच्छताह्ण, ह्यसंसाधन व्यवस्थापनह्ण, ह्यउद्योगह्ण, ह्यकृषी व अन्न सुरक्षाह्ण, ह्यआपत्कालीन व्यवस्थापनह्ण आणि ह्यदर्जेदार जीवनासाठी गणितह्ण आदी उपविषयांचीदेखील निवड करण्यात आली आहे. याच दरम्यान प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक, प्रयोगशाळा परिचर, सहायक यांच्या शैक्षणिक साहित्याची तसेच लोकसंख्या शिक्षण प्रदर्शनाचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाची पूर्वतयारी म्हणून २६ ऑक्टोबर रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
शिक्षकांना मिळणार विज्ञान प्रतिकृतींचे प्रशिक्षण !
By admin | Published: October 22, 2015 1:49 AM