अकोला : पुरग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी सांगली येथे राज्याचे गृह(शहरे), विधी व न्यायविभाग, संसदीय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागांचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांच्या नेतृत्वात पुरगस्त भागात अकोला येथील आठ डॉक्टरांची चमु आज रवाना झाली.
अतिवृष्टीमुळे सांगलीसह सातारा व कोल्हापुर जिल्ह्यात प्रचंड पुर परिस्थीती निर्माण झाली आहे. यामुळे साथीचे रोग त्वचारोग होण्याची शक्यता आहे. यासाठी तातडीची मदत म्हणून आठ डॉक्टरासह , दोन फार्मसिस्ट , काही सामाजिक कार्यकर्तेसह पॅरामेडिकल्स स्टॉफ , दोन ॲम्बुलन्स , ऑक्सीजन सिलेंडरसह दहा हजार पुरग्रस्तांना पुरेल एवढा औषधीसाठा घेवून पहिल्या टप्प्यात पथक सांगलीला रवाना झाले आहे. सदर पथक तीन-चार दिवस व आवशकता वाटल्यास जास्त् दिवस सेवा देणार आहे.एक दोन दिवसानंतर दुस-या व तिस-या टप्प्यात कपडे व इतर जिवनाश्यक वस्तु घेवून जाण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
ज्या सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती व समाजातील इतर व्यक्ती यांना मदत करावयाची असेल त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन शाखेत मदत दयावी तसेच रोख रक्कम मुख्य मंत्री सहायता निधी मध्ये कोणत्याही बँकेत जमा करता येईल तरी जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींनी पुढे येवून या सामाजिक कार्याला मदत करावी असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले आहे.