अकोला: महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर बुधवारी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे शहरवासीयांना एक दिवसाने उशिरा पाणीपुरवठा केला जाईल. महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर बुधवारी तांत्रिक बिघाड झाला. यामुळे शहराच्या पाणीपुरवठय़ाचे नियोजन कोलमडले. धरणातील अत्यल्प जलसाठा लक्षात घेता मनपाने अकोलेकरांना सात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. तांत्रिक बिघाडामुळे शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाने समोर ढकलण्यात आला. बुधवारी शहरातील पुर्व भागात पाणीपुरवठा करण्यात आला.
जलशुद्धीकरण केंद्रावर तांत्रिक बिघाड
By admin | Published: August 06, 2015 1:15 AM