शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
5
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
6
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
8
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
9
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
10
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
11
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
13
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
14
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
15
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
16
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
17
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
18
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
19
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
20
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

एक कोटीपर्यंतच्या कामांना आता दिली जाणार तांत्रिक मान्यता!

By admin | Published: March 04, 2016 2:00 AM

जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांचे वाढविले अधिकार.

संतोष येलकर/अकोलाजिल्हा परिषद अंतर्गत बांधकामे व दुरुस्तीच्या कामांसाठी आता एक कोटीपर्यंतच्या कामांना जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून तांत्रिक मान्यता दिली जाणार आहे. त्यासाठी शासनामार्फत जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांचे तांत्रिक मान्यता देण्याचे अधिकार वाढविण्यात आले आहेत.जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत बांधकामे आणि विकास योजनांशी संबंधित २५ लाखांच्या कामांसाठी तांत्रिक मंजुरी देण्याचे अधिकार यापूर्वी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी अभियंत्यांना होते. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या कामांसंबंधी तांत्रिक मान्यता देण्याच्या कार्यकारी अभियंत्यांच्या अधिकारात वाढ करण्याची मागणी राज्यातील विविध जिल्हा परिषदांकडून करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत मूळ बांधकामे व दुरुस्ती कामांसंबंधी तांत्रिक मान्यता देण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांच्या अधिकारात वाढ करून, एक कोटीपर्यंतच्या कामांना तांत्रिक मान्यता देण्याचे अधिकार कार्यकारी अभियंत्यांना देण्याचा निर्णय शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत २४ फेब्रुवारी रोजी घेण्यात आला.'या' अटींचे करावे लागणार पालन!जिल्हा परिषद स्तरावर एक कोटीच्या र्मयादेपर्यंत कामांना देण्यात आलेल्या तांत्रिक मान्यतेची माहिती विषय समिती, स्थायी समिती व पंचायत समितीच्या सभेत अवलोकनार्थ सादर करावी लागेल, तसेच जिल्हा परिषदेतील प्रत्येक विभागामार्फत यासंदर्भात करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सादर करावा लागणार आहे. या दोन अटींचे पालन जिल्हा परिषदांना करावे लागणार आहे.विकासकामांचा मार्ग मोकळा!जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या २५ लाखांवरील बांधकामे व दुरुस्तीच्या कामांसाठी यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडून तांत्रिक मान्यता घ्यावी लागत होती; परंतु शासन निर्णयानुसार आता एक कोटीच्या र्मयादेपर्यंत कामांसाठी तात्रिक मान्यता देण्याचे अधिकार जिल्हा परिषद स्तरावरच कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आल्याने, तांत्रिक मान्यतेअभावी रखडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत विकासकामांचा मार्ग आता मोकळा झाला आहे.