यावेळी हरभरा पिकाचे सर्वेक्षण करून तसेच त्यावरील कीड व रोगांची निरीक्षणे घेऊन किडींच्या आर्थिक नुकसान पातळीनुसार व्यवस्थापन करणे, जैविक किड नियंत्रण करणे, मित्र किड यांचे महत्त्व, जैविक कीड नियंत्रणासाठी शेतात पक्षी थांबे उभारणे व त्याचे महत्त्व तसेच कामगंध सापळे उभारणे, पिकात डवरणी करून तणव्यवस्थापन करणे, शेतीशाळेमध्ये शेतकऱ्यांना घरगुती पध्दतीने जीवामृत तयार करून कृती प्रत्यक्षात या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शेतीशाळा प्रशिक्षक सागर किसनराव गावंडे यांची उपस्थिती होती. शेतीशाळेत कृषी मित्र पंकज वाघाडे, वामनराव देशमुख, श्रीकृष्ण साबळे, विनोद वाघोडे, श्याम देशमुख, बबलू सुरे, गजानन इंगळे, मधुकर वाघोडे, तुळशीराम वाघोडे, प्रफुल्ल पुंडे, श्रीकृष्ण पांडे, मुरलीधर गुरव, गणेश पुंडकर, गोपाल पांडे, पिंटू बिलेवार, विश्वासराव देशमुख आदी शेतकरी उपस्थित होते. (फोटो)
अंत्री मलकापूर येथे तंत्रज्ञान शेतीशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 4:17 AM