तालुक्यातील खेल सटवाजी व चांगळवाडी या दोन ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली, तर अनेक गावांत दिव्यांग, वयोवृद्ध मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ग्रामपंचायत निवडणूक गावात प्रतिष्ठेची असल्याने बाहेरगावी राहायला असलेल्या मतदारांनी गावात पोहोचून मतदान केले. मतदान प्रकियामध्ये सात क्षेत्रीय अधिकारी होते. तसेच ६०० कर्मचारी कार्यरत होते. मतदान केंद्रांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरिता मास्क व मतदारांचे तापमान व ऑक्सिजन लेव्हल मीटर, तसेच सॅनिटायझर ठेवले होते. निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश शेळके व पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, तसेच आरसीपी कमांडो तैनात होते. मतदान प्रक्रियेकरिता उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, तहसीलदार राजेश गुरव, नायब तहसीलदार सुरडकर व जरे यांनी कामकाज सांभाळले. सदर मतमोजणी १८ जानेवारी रोजी तहसील कार्यालयातील गोदामात होणार आहे.
तेल्हारा : ६५४ उमेदवारांचे भाग्य मशीनबंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 4:22 AM