आतापर्यंत अपेक्षित पाऊस
४७५.३ मिमी
प्रत्यक्ष झालेला पाऊस
४२३.४ मिमी
पेरणी वाया जाण्याची शक्यता (आकडे हेक्टरमध्ये)
सोयाबीन २३०२२५
कापूस १४०५४७
तूर ५५१०४
उडीद १४७५५
मूग २२२७५
ज्वारी ७०७२
पाणीसाठा वाढला! (आकडे दलघमी)
काटेपुर्णा ७०.२३
वान ४५.१०
मोर्णा २२.२८
निर्गुणा २१.९७
गत काही दिवसांपासून पावसाची चिन्हे दिसून येत नाहीत. त्यामुळे पिके सुकू लागली आहे. आणखी काही दिवस पाऊस न झाल्यास पिके खराबही होऊ शकतात.
- दिनेश देशमुख, शेतकरी
दोन एकरात सोयाबीनची पेरणी केली आहे. पाऊस नसल्याने फुले गळण्याची भीती आहे. काही दिवसांमध्ये पीकही खराब होऊ शकते.
- मोहन खुपसे, शेतकरी
ऑगस्टमध्ये केवळ २१.३ मिमी पाऊस
जून, जुलै या दोन महिन्यात जिल्ह्यात दमदार ४०२ मिमी पाऊस झाला; मात्र त्यानंतर ऑगस्ट महिन्यात केवळ २१.३ मिमी म्हणजेच २३.६ टक्के पाऊस झाला. चार-पाच दिवसांत तुरळक ठिकाणीही पावसाच्या सरी बरसल्या नसल्याची नोंद आहे.