बाळापूर, दि. ५- भरधाव टेम्पोने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कारला धडक दिल्याची घटना व्याळाजवळ ५ नोव्हेंबर रोजी घडली. सुदैवाने यामध्ये कुणीही जखमी झाले नाही. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात व्याळाजवळ इंडिगो कार क्र.एमएच ३0 एएफ ८६६९ ला धडक दिली. या अपघातात कुणीही जखमी झाले नाही. टेम्पोच्या धडकेने कारचे नुकसान झाले. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वेग र्मयादेचे उल्लंघन होत असल्याने हे अपघात होत आहेत.
टेम्पोची कारला धडक
By admin | Published: November 06, 2016 2:06 AM