शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

दहा दिवस उलटले; पण शेतकऱ्यांना मिळाली नाही दुष्काळी मदत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:09 PM

अकोला: जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकºयांच्या मदतीसाठी पहिल्या हप्त्यात शासनामार्फत प्राप्त झालेला ४० कोटी ७७ लाख ७ हजार ७२८ रुपयांचा मदतनिधी पाच तहसील कार्यालयांना १ फेबु्रवारी रोजी वितरित करण्यात आला. दहा दिवसांचा कालावधी उलटून जात असला, तरी तहसील कार्यालयांकडून दुष्काळी मदतीचे वाटप अद्याप सुरू करण्यात आले नाही

- संतोष येलकरअकोला: जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकºयांच्या मदतीसाठी पहिल्या हप्त्यात शासनामार्फत प्राप्त झालेला ४० कोटी ७७ लाख ७ हजार ७२८ रुपयांचा मदतनिधी पाच तहसील कार्यालयांना १ फेबु्रवारी रोजी वितरित करण्यात आला. दहा दिवसांचा कालावधी उलटून जात असला, तरी तहसील कार्यालयांकडून दुष्काळी मदतीचे वाटप अद्याप सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या मदतीसाठी ८१ कोटी ५५ लाख ५ हजार ४५६ रुपयांचा मदतनिधी शासनामार्फत मंजूर करण्यात आला आहे. मंजूर करण्यात आलेल्या दुष्काळी मदतनिधीपैकी पहिल्या हप्त्यात ४० कोटी ७७ लाख ७ हजार ७२८ रुपयांचा मदतनिधी ३१ जानेवारी रोजी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. उपलब्ध मदतनिधी दुष्काळग्रस्त पाचही तालुक्यांच्या तहसील कार्यालयांना वितरित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी १ फेबु्रवारी रोजी दिला. संबंधित तहसील कार्यालयांमार्फत मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करायची आहे; मात्र दहा दिवसांचा कालावधी उलटून जात असला तरी, १० फेबु्रवारीपर्यंत तहसील कार्यालयांकडून दुष्काळी मदत शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकºयांना अद्याप दुष्काळी मदतीचा लाभ मिळाला नाही. त्यानुषंगाने मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात जमा होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.बँक खाते क्रमांकांची जुळवाजुळव सुरूच!दुष्काळी मदतीची रक्कम उपलब्ध होऊन दहा दिवसांचा कालावधी पूर्ण होत असला, तरी मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यासाठी शेतकºयांचे बँक खाते क्रमांक गोळा करण्याचे काम तहसील कार्यालयांकडून अद्याप पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे बँक खाते क्रमांकाची जुळवाजुळव करण्याचे काम पूर्ण केव्हा होणार आणि शेतकºयांच्या खात्यात प्रत्यक्षात दुष्काळी मदत केव्हा जमा होणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.पाच तालुक्यांत असे आहेत दुष्काळग्रस्त शेतकरी!तालुका                       कोरडवाहू                       बागायतीअकोला                       ६२७२७                          ३००३बार्शीटाकळी                ३५५५३                         ५०९३तेल्हारा                       १४७०५                        १२७८५बाळापूर                      २०३०८                         १९२०मूर्तिजापूर                    ३८६८०                      .....................................................................................एकूण                          १७१९७३                     २२८०१तालुकानिहाय असा वितरित करण्यात आला मदतनिधी!जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकºयांना पहिल्या हप्त्यात दुष्काळी मदत वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ४० कोटी ७७ लाख ७७ हजार २८० रुपयांचा मदतनिधी पाच तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आला. त्यामध्ये अकोला तालुका -१० कोटी ७८ हजार १२३ रुपये, बार्शीटाकळी तालुका -६ कोटी ७१ लाख ९० हजार ८१९ रुपये, तेल्हारा तालुका -६ कोटी ३५ लाख ९८ हजार ३५७ रुपये, बाळापूर तालुका -८ कोटी ३० लाख ११ हजार २३४ रुपये व मूर्तिजापूर तालुक्यासाठी ८ कोटी ६१ लाख ७६ हजार ७४७ रुपयांचा मदतनिधी वितरित करण्यात आला.मदतीचे असे होणार वाटप!प्रतिहेक्टर ६ हजार ८०० रुपयेप्रमाणे मदत वाटप करण्यात येणार आहे. त्यापैकी ५० टक्के रक्कम म्हणजेच प्रतिहेक्टर ३ हजार ४०० रुपये पहिल्या हप्त्यात आणि तेवढीच रक्कम दुसºया हप्त्यात वाटप करण्यात येणार आहे, तर बहुवार्षिक पीक नुकसान भरपाईपोटी दुष्काळग्रस्त शेतकºयांना प्रतिहेक्टर १८ हजार रुपये मदत वाटप करण्यात येणार असून, त्यापैकी ५० टक्के म्हणजेच नऊ हजार रुपये पहिल्या हप्त्यात व तेवढीच रक्कम दुसºया हप्त्यात वाटप करण्यात येणार आहे. 

दुष्काळी मदत वाटप करण्यासाठी शेतकºयांचे बँक खाते क्रमांक गोळा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या दोन-तीन दिवसांत मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.-विजय लोखंडे,तहसीलदार, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाdroughtदुष्काळFarmerशेतकरीagricultureशेती