अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग मंदावला असला, तरी रुग्ण आढळण्याचे सत्र सुरुच आहेच आहेे. मंगळवार, १५ डिसेंबर आरटीपीसीआर आणखी १० पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ९,९९० झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ७२२ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ७१२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये तोष्णीवाल लेआऊट येथील दोन, तर गोरक्षण रोड, मेन सिटी, यमुना संकुल, बार्शीटाकली, बाळापूर, वाशिम बायपास, देशमुख फैल व उजवलेश्वर ता. बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
६६४ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९९९० जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८९३२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३०४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६६४ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.