तेल्हारा : शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट
वाढला असून, एका पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल दहा जणांना चावा
घेतला आहे. त्यापैकी तीन जणांना उपचारासाठी अकोला येथे पाठविल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयातून मिळाली
आहे. कुत्र्याचा हैदोस वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित विभागाने लक्ष देऊन कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
शहरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे. त्यामुळे मुले, महिला व ज्येष्ठ नागरिक त्रस्त झाले आहेत. भटक्या कुत्र्यांनी तीन मुलांना व नागरिकांना चावा घेतल्याची घटना मंगळवारी शहरात घडली. जखमींना अकोला येथे पाठविण्यात आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अशोक तापडिया यांनी दिली. शहरात मोकाट गुरांसह कुत्रे व डुकरे यांचा मुक्तसंचार वाढला असून, याकडे नगर परिषद प्रशासनाचे र्दुलक्ष होत आहे.
----------------
तिघांना केले अकोल्याला ‘रेफर’!
एका पिसाळलेल्या कुत्र्याने तेल्हारा शहरात तब्बल दहा जणांना चावा घेतला असून, त्यापैकी तीन जणांना उपचारासाठी अकोला येथे पाठविल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयातून मिळाली आहे. भटक्या कुत्र्यांचा हैदोस वाढला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
---------------------