अकोला : पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात १०६ सरपंच, ११६ उपसरंपचांची निवड अकोला: सार्वत्रिक निवडणुका झालेल्या जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदांची निवडणूक दोन टप्प्यात घेण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात मंगळवार, ९ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील ११६ सरपंच व उपसरंपचपदांसाठी निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये १०६ सरपंच व ११६ उपसरंपचांची निवड करण्यात आली असून, सरपंचपदाच्या आरक्षणानुसार आरक्षित प्रवर्गातील ग्रामपंचायत सदस्य नसल्याने जिल्ह्यात दहा सरपंचांची पदे रिक्त राहिल्याचे चित्र स्पष्ट झाले.
जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. आरक्षण जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचांची निवडणूक घेण्यात येत आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ११६ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदांच्या निवडणुकीसाठी ग्रामपंचायतींच्या प्रथम विशेष सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. ग्रामपंचायतींच्या विशेष सभांमध्ये ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंच व उपसरपंचांची निवड करण्यात आली. सरपंचपदांच्या आरक्षणानुसार जिल्ह्यात ११६ सरपंचांपैकी १०६ सरपंचांची निवड करण्यात आली असून,११६ उपसरपंचांची निवड करण्यात आली. सरपंचपदांच्या आरक्षणानुसार आरक्षित प्रवर्गातील ग्रामपंचायत सदस्य निवडून आले नसल्याने अनुसूचित जाती प्रवर्गातील २ आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील ८ सरपंचांची निवड होऊ शकली नाही. त्यामुळे जिल्ह्यात दहा सरपंचांची पदे रिक्त राहिल्याचे चित्र आहे.
ग्रामपंचायत व प्रवर्गनिहाय रिक्त राहिलेली अशी आहेत सरपंचपदे!
तालुका ग्रा.पं. प्रवर्ग
अकोट चोहोट्टा बाजार अनूसूचित जाती
अकोट सावरा अनूसूचित जमाती (स्त्री)
अकोट मकरमपूर अनुसूचित जाती
तेल्हारा चांगलवाडी अनूसूचित जमाती
तेल्हारा वांगरगाव अनुसूचित जमाती (स्त्री)
अकोला खांबोरा अनूसूचित जमाती (स्त्री)
पातूर आलेगाव अनुसूचित जमाती
पातूर विवरा अनूसूचित जमाती(स्त्री)
पातूर दिग्रस खुर्द अनूसूचित जमाती(स्त्री)
पातूर चरणगाव अनूसूचित जमाती (स्त्री)
..