शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
4
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
5
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
6
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
7
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
8
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
9
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
10
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
12
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
13
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
14
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
15
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
16
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
17
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
18
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
19
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...

लग्नाचे आमिष देऊन तरुणीवर बलात्कार करणाऱ्यास दहा वर्षांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 3:26 PM

अकोला : लग्नाचे आमिष दाखवून २० वर्षीय तरुणीला गर्भवती करून सोडून देणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश (प्रथम) मोनिका आरलँड यांच्या न्यायालयाने अत्याचार करणे, अ‍ॅट्रॉसिटीसह आदी गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवित १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा शुक्रवारी सुनावली.

ठळक मुद्दे प्रशांत सुरेश देशमुख (२५, रा. सावरखेड) याची ओळख पिडीत मुलीसोबत झाली. २०१४ मध्ये तिच्याशी शारीरिक संबंध स्थापन केले. यामध्ये ती गर्भवती राहिली. मुलीने १५ आॅगस्ट २०१४ रोजी पिंजर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली.

अकोला : लग्नाचे आमिष दाखवून २० वर्षीय तरुणीला गर्भवती करून सोडून देणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश (प्रथम) मोनिका आरलँड यांच्या न्यायालयाने अत्याचार करणे, अ‍ॅट्रॉसिटीसह आदी गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवित १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा शुक्रवारी सुनावली. तसेच एक लाख रुपयांचा दंड, दंडातील ५० हजार रुपये पिडीत मुलीला व ५० हजार रुपये तिच्या मुलीला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. तसेच लिगल हेड सर्व्हीसअंतर्गत असलेल्या ‘व्हीक्टीम कॉम्पनसेशन स्किम’मधून ५ लाख रुपये देण्याची शिफारसही न्यायालयाने केली. ही घटना पिंजर पोलिस स्टेशनअंतर्गत २०१४ मध्ये घडली होती. पिडीत मुलीचे आईवडील मानसिक आजाराने ग्रस्त होते. वडील शेतात मजुरी करीत. तसेच ती पण शेतामध्ये मजुरी करीत होती. मजुर सांगण्याचे काम करणाºया प्रशांत सुरेश देशमुख (२५, रा. सावरखेड) याची ओळख पिडीत मुलीसोबत झाली. त्याने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून मार्च २०१४ मध्ये तिच्याशी शारीरिक संबंध स्थापन केले. यामध्ये ती गर्भवती राहिली. प्रशांत देशमुख हा ७ आॅगस्ट २०१४ रोजी रात्री १० वाजता पिडीत मुलीच्या घरी गेला. मी तुज्याशी लग्न करणार नाही, तु हे कोणालाही सांगितले तर तुला मारून टाकेन, अशी धमकी प्रशांत देशमुखने तिला दिली. त्यावेळी ती मुलगी ५ महिन्यांची गर्भवती होती. मुलीने १५ आॅगस्ट २०१४ रोजी पिंजर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली. पोलिसांनी अत्याचार करणे, अ‍ॅट्रॉसिटीसह आदी कलमांवये गुन्हे नोंदवून त्याला अटक केली. जानेवारी २०१५ रोजी मुलीने चिमुकल्या मुलीस जन्म दिला. पोलिसांनी तिचा डीएनएचा अहवाल प्राप्त केला. पोलिसांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश (प्रथम)मोनिका आरलँड यांच्या न्यायालयाने सरकार पक्षातर्फे ८ साक्षीदार तपासले. आरोपीला दोषी ठरवित न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच एक लाख रुपयांचा दंड, दंडातील ५० हजार रुपये पिडीत मुलीला व ५० हजार रुपये तिच्या मुलीला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिलेत. तसेच लिगल हेड सर्व्हीसअंतर्गत असलेल्या ’व्हीक्टीम कॉम्पनसेशन स्किम’मधून ५ लाख रुपये देण्याची शिफारसही न्यायालयाने केली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. मंगला पांडे यांनी काम पाहिले.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयRapeबलात्कार