वाशिम: अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरणात जिल्हय़ातील कारंजा येथील मुकेश ऊर्फ विक्की सुरेश डेंडुळे या आरोपीस बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा शुक्रवार ८ जानेवारी रोजी ठोठावली. कारंजा येथे ५ डिसेंबर २0१३ रोजी सदर घटना घडली होती. पीडित बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी मुकेश ऊर्फ विक्की डेंडुळे याने चार वर्षीय बालिकेला घराच्या मागे नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. पोलीस निरीक्षक वर्षा मते यांनी तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते. सदर प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायाधीश (१) व अतिरिक्त सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या कोर्टात करण्यात आली. आरोपी मुकेश ऊर्फ विक्की डेंडुळे यास कलम ३७६ भादंवि अन्वये सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास पुन्हा ५ (एम) सेक्शन ६, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा अन्वये दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास पुन्हा ६ महिने सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता माधुरी मिसर यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.
बलात्कारी आरोपीस दहा वर्ष सक्तमजुरी
By admin | Published: January 09, 2016 2:39 AM