एका आठवड्याचाच स्टॉक शिल्लक
बाजारपेठेत एक आठवडा पुरेल एवढाच ड्रायफ्रूट्सचा साठा शिल्लक असल्याची माहिती आहे.
त्यामुळे येत्या काही दिवसांत ड्रायफ्रूट्सच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अफगाणिस्तान आणि भारतातील व्यापारी संबंध पूर्ववत सुरू झाल्यास परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे.
हे पाहा भाव (प्रति किलो)...
तणावापूर्वीचे भाव - सध्याचे भाव
पिस्ता (खारा) - ८७० - ९००
जर्दाळू - ५५० - ६५०
काळा मनुका - ४८० - ५००
अंजीर - ६०० ते १४०० - ७०० ते १५००
अफगाणिस्तानातून प्रामुख्याने काळा मनुका, अंजीर आणि जर्दाळूची आयात केली जाते. इतर देशांतूनही ड्रायफ्रूट्सची आयात केली जाते. त्यामुळे फारसा फरक पडणार नाही, मात्र काही प्रमाणात दरवाढ होण्याची शक्यता आहे.
- सागर जैन, ड्रायफ्रूट्स विक्रेते