शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
5
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
6
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
7
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
8
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
9
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
10
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
11
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
12
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
13
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
14
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
15
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
16
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
17
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
18
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
19
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
20
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज

सर्व शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 4:16 AM

अकोला : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, शासनाने अखेर इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाची स्थिती ...

अकोला : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, शासनाने अखेर इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. दहावीचा निकाल कसा लागेल, त्याचे सूत्र कसे असेल, आदी प्रश्न उपस्थित झाले होते. अखेर माध्यमिक शिक्षण विभागाने निकालाचे सूत्र जाहीर केले आहे. या सूत्राच्या आधारे सर्वच शाळांचा निकाल १०० टक्के लागणार असल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे इयत्ता दहावीची परीक्षा पुढे ढकलली होती; परंतु कोरोनाचा प्रकोप वाढतच असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून शासनाने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला, तसेच बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. दहावीची परीक्षाच होत नसल्याने आता विद्यार्थ्यांना कोणत्या आधारे उत्तीर्ण करणार, असा प्रश्न प्रारंभी समोर आला. पालक, विद्यार्थ्यांनाही गुण आणि गुणवत्तेबाबत चिंता सतावत होती. कारण गुणवंत विद्यार्थी व पास श्रेणीतील विद्यार्थी एकाच रांगेत आल्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय तर होणार नाही, अशी अटकळ विद्यार्थ्यांच्या मनात अद्यापही कायम आहे. दहावीच्या निकालाचे सूत्र शिक्षण विभागाने जाहीर केले असले तरी, पालक व विद्यार्थ्यांना अद्यापही गुणांबाबत भीती वाटत आहे. शिक्षण विभागाने कोणत्याही विद्यार्थ्याला नापास न करता, सरसकट पास करण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु यात गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान व्हायला नको, अशी पालकांची अपेक्षा आहे.

जिल्ह्यातील दहावीचे एकूण विद्यार्थी

२६९७७

मुले- १४५५१

मुली- १२४२६

असे असेल नवे सूत्र

माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीतील कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान न करता त्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यात येणार आहे, तसेच नववीतील ५० टक्के गुण लक्षात घेतले जाणार आहेत आणि इयत्ता दहावीतील अंतर्गत मूल्यमापन करून विद्यार्थ्यांना गुण दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांचे दहावीच्या वर्षातील अंतर्गत लेखी मूल्यमापन ३० गुण, गृहपाठ, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा यांना २० गुण, विद्यार्थ्यांचा ९ वीचा विषयनिहाय अंतिम निकाल ५० गुण, या आधारे विद्यार्थ्यांचे यंदाचे मूल्यमापन करण्यात येईल, तसेच विद्यार्थ्यांचे कोविडपूर्वकाळातील संपादणूक पातळीही विचारात घेतली जाणार आहे.

दहावीच्या अभ्यासक्रमावर सीईटी

अकरावी प्रवेशासाठी दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित वैकल्पिक सीईटी घेणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सीईटीतील गुणांच्या गुणवत्तेच्या आधारे अकरावीसाठी प्रवेश प्राधान्य देण्यात येणार आहे.

विद्यार्थी आनंदित

शासनाने दहावीतील विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला नाही, पास होण्याची खात्री नाही, अशा विद्यार्थ्यांचे चांगलेच फावले आहे. द्वितीय व पास श्रेणीतील विद्यार्थी या निर्णयामुळे आनंदित झाले आहेत; परंतु गुणवंत, प्रथम श्रेणीच्या विद्यार्थ्यांना मात्र गुण कसे मिळतील, या गुणांच्या आधारे अकरावी विज्ञान शाखेसह आयटीआय, पॉलिटेक्निकला प्रवेश मिळेल का, याची चिंता सतावत आहे.

शिक्षणतज्ज्ञ काय म्हणतात?

विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्यात येणार आहे. अंतर्गत मूल्यमापन करून इयत्ता नववीतीलही ५० टक्के गुण विचारात घेतले जाणार आहेत. निकाल देताना गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान व्हायला नको.

-जितेंद्र काठाेळे, शिक्षणतज्ज्ञ

विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनावर भर देण्यात आला आहे. नववीचेही गुण लक्षात घेतले जातील. परीक्षा रद्दमुळे सर्वच विद्यार्थी एकाच रांगेत येऊन बसविले आहेत. यात गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान होता कामा नये. त्यांच्या भवितव्याचा विचार करून गुण द्यावेत.

-आनंद साधू, मुख्याध्यापक महाराष्ट्र माध्यमिक शाळा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १० वीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापन करून निकाल बोर्डाकडे पाठविला जाईल. अंतर्गत प्रात्यक्षिक स्वरूपाचे गुण दिले जातील. ही पद्धत योग्य असून, १० वीनंतर आयटीआय, विविध शाखांतील प्रवेशासाठी टीईटी होणार आहे. टीईटीच्या आधारावर सर्व प्रवेश निश्चित करावेत. गुणपत्रिका अंतर्गत मूल्यमापनावर तयार करावी.

-प्रा. प्रकाश डवले, शिक्षणतज्ज्ञ

कोरोनामुळे परीक्षा रद्द झाली. वर्षभर विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. परीक्षेची तयारी केली. आता अंतर्गत मूल्यमापन करून गुण देणार आहेत. यात गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी शिक्षकांनी घ्यावी.

-अजय पाटील, पालक

दहावीतील अंतर्गत मूल्यमापन, नववीतील ५० टक्के गुणांच्या आधारे निकाल लागणार आहे; परंतु निकालामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना कसे गुण मिळतील, याची चिंता वाटते. त्यांचे नुकसान व्हायला नको. सीईटीमध्ये मिळणाऱ्या गुणांचा पुढील प्रवेशासाठी विचार व्हावा.

-सुभाष धाडसे, पालक