अकाेला : राज्यात १५ फेब्रुवारीपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद राहतील. मात्र, दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी आवश्यक उपक्रमांना सूट असणार आहे. राज्य शासनाच्या सूचनेमुळे आणि शालेय विभागाच्या अस्पष्ट निर्देशांमुळे यात गाेंधळ आहे. शिक्षण विभाग व अधिकाऱ्यांमध्येच एकवाक्यता नसल्याने शालेयस्तरावरील सध्या सुरू असलेल्या सराव परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन घ्याव्यात, याबाबत अनेक शाळा व्यवस्थापन संभ्रमात सापडली आहेत. परीक्षा मंडळाच्या परीक्षांची वेळ येईपर्यंत काेराेनाची स्थिती काय राहते, यावरही परीक्षांचे भवितव्य अवलंबून राहणार असल्याने पालकांसह विद्यार्थ्यांचाही गाेंधळ उडत आहे.
दहावीच्या परीक्षेसाठी २५ हजारावर विद्यार्थी
दहावीच्या परीक्षेसाठी या शैक्षणिक सत्रात २५ हजारावर विद्यार्थी राहतील. गेल्यावर्षी काेराेनाच्या सावटामुळे अंतर्गत मूल्यमापनावर परीक्षेचा निकाल लावण्यात आला. यामध्ये ९९.९८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले हाेते.
बारावीची विद्यार्थी संख्या वाढली
अंतर्गत मूल्यमापनावर निकाल लागल्यामुळे दहावीमधून उत्तीर्ण हाेणाऱ्यांचे प्रमाण यंदा सर्वाधिक हाेते. त्यामुळे साहजिकच बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या २५ हजारांपर्यंत नाेंदविली जाणार आहे. गेल्यावर्षी २३ हजार २४० विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले हाेते.
दहावीची परीक्षा १५ मार्चपासून
दहावी बोर्डाची परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल दरम्यान होणार आहे. दहावीची परीक्षा नियमित मूल्यमापन पद्धतीने ऑफलाईनच होणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले होते.
बारावीची परीक्षा ४ मार्चपासून
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीच्या परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान होणार आहे.
सराव ऑनलाईन की ऑफलाईन
सराव परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन हा गाेंधळ कायम आहे. सद्यस्थितीत राज्यातील काही भागांमध्ये दहावी व बारावीचे वर्ग ऑफलाईन भरत आहेत. त्यामुळे जेथे शाळा बंद केलेल्या आहेत, त्यांना शाळा लवकरच सुरू हाेतील, अशी अपेक्षा आहे.
शाळेत गेल्यावरच काेराेना हाेताे का?
दहावीचे वर्ष आहे म्हणून सगळेच अभ्यास करण्यासाठी सूचना देत असतात. मात्र, खरा अभ्यास हा शाळेतच हाेताे. सध्या कुठेही जाता येते मग शाळेतच गेल्यावर काेराेना कसा हाेईल? शाळा लवकर सुरू कराव्यात.
- प्रसन्न पांडे
काेविड लसीचा पहिल्या डाेस घेतला
आम्ही आता काेविड लसीकरणासाठी पात्र ठरल्याने पहिला डाेस घेतला आहे. त्यामुळे शाळा पूर्ववत सुरू कराव्यात, जेणेकरून सराव परीक्षांमधून मुख्य परीक्षेची चांगली तयारी करता येईल. ऑनलाईन फारसे प्रभावी वाटत नाही.
- अंजली पुनकर
दहावीसाठी एकूण केंद्र ००००
बारावीसाठी एकूण केंद्र ००००