शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

अकोला मनपाच्या झोन सभापतींचा कार्यकाळ संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 1:32 PM

अकोला : महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने गठित केलेल्या चार झोन समितीच्या सभापतींचा एक वर्षाचा कालावधी संपुष्टात आला आहे.

ठळक मुद्दे झोन समित्यांना एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे.१७ एप्रिल रोजी झोन समिती सभापतींची नव्याने निवड केली जाणार आहे. १६ एप्रिल रोजी इच्छुक उमेदवारांना नगर सचिव अनिल बिडवे यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर करता येतील.

अकोला : महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने गठित केलेल्या चार झोन समितीच्या सभापतींचा एक वर्षाचा कालावधी संपुष्टात आला आहे. त्या पृष्ठभूमीवर येत्या १७ एप्रिल रोजी मनपाच्या मुख्य सभागृहात झोन समिती सभापतींची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. इच्छुक उमेदवारांना १६ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. यादरम्यान, आगामी निवडणुका लक्षात घेऊन सत्तापक्ष भाजपाकडून झोन समितीच्या माध्यमातून का होईना, राजकीय समतोल साधण्याचा प्रयत्न केला जाण्याची दाट शक्यता आहे.फेब्रुवारी २०१७ मध्ये पार पडलेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अकोलेकरांनी भाजपाच्या पारड्यात मतांचे भरभरून दान दिल्यामुळे भाजपाला महापालिकेत सत्ता स्थापन करता आली. एकूण ८० जागांपैकी भाजपाने ४८ जागांवर विजय संपादित केला. ९ मार्च २०१७ रोजी महापौर विजय अग्रवाल यांचा पदग्रहण सोहळा पार पडल्यानंतर झोननिहाय गठित केलेल्या समिती सभापतींची निवड करण्यात आली होती. झोन समित्यांना एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे येत्या १७ एप्रिल रोजी महाराष्ट्र महापालिका अधिनियमनुसार झोन समिती सभापतींची नव्याने निवड केली जाणार आहे. त्यासाठी १६ एप्रिल रोजी इच्छुक उमेदवारांना नगर सचिव अनिल बिडवे यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर करता येतील. त्यानंतर १७ एप्रिल रोजी मनपाच्या मुख्य सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडेल.वर्षभरात विशेष काहीच नाही!सत्ताधारी भाजपाने मोठ्या उत्साहात झोन समित्यांचे गठन केले. निवड झालेले सभापती मनोमन सुखावले. मनपाकडून वाहन, कार्यालय मिळणार, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. मोठ्या कष्टाने सभापतींना बसण्यासाठी कार्यालय मिळाले खरे पण, त्याठिकाणी कोणत्याही सुविधा नव्हत्या, हे विशेष. वर्षभराच्या कालावधीत झोनमधील तर सोडाच, प्रभागातील विकास कामांसाठी सुद्धा सभापती या नात्याने कोणताही विशेष निधी मिळाला नाही. मनपाच्या अर्थसंकल्पात झोन समिती सभापतींनी सुचविलेल्या एकाही सूचनेचा समावेश होणार की नाही, यावरही प्रश्नचिन्ह लागले आहे. तरीही केवळ नावासमोर सभापतीची पाटी चिकटविल्या जात असल्याने काहींनी पक्षाकडे लॉबिंग सुरू केल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका