अकोला : खरीप हंगामासाठी शेतकºयांना पीक कर्ज वाटप करण्यात येत असून, ११ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील १ लाख १ हजार २७४ शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. पीक कर्ज वाटपाची मुदत १५ दिवसांवर आली असली तरी, जिल्ह्यातील ४१ हजार २२६ शेतकºयांना अद्याप पीक कर्ज मिळाले नाही. त्यामुळे प्रतीक्षेत असलेल्या शेतकºयांना पीक कर्जाचा लाभ मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार ५०० शेतकºयांना १ हजार ११४ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत ठरविण्यात आले आहे. त्यानुषंगाने गेल्या २६ एप्रिलपासून बँकांमार्फत जिल्ह्यातील पात्र शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप सुरू करण्यात आले. उद्दिष्टाच्या तुलनेत ११ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील १ लाख १ हजार २७४ शेतकºयांना ८०२ कोटी ८७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. खरीप हंगामातील कर्ज वाटपाची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपणार आहे. कर्ज वाटपाची मुदत १५ दिवसांवर येऊन घेतली असताना, जिल्ह्यातील ४१ हजार २२६ शेतकºयांना अद्याप पीक कर्ज मिळाले नाही. त्यामुळे पीक कर्जाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकºयांना खरीप पीक कर्जाचा लाभ मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.बँकनिहाय पीक कर्ज वाटपाचे असे आहे वास्तव!जिल्ह्यात ११ सप्टेंबरपर्यंत बँकांमार्फत १ लाख १ हजार २७४ शेतकºयांना ८०२ कोटी ८७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. त्यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत ३४ हजार ४५५ शेतकºयांना ३१५ कोटी ७७ लाख रुपये, ग्रामीण बँकेमार्फत १२ हजार ३६ शेतकºयांना ११० कोटी १६ लाख रुपये आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ५४ हजार ७८३ शेतकºयांना ३७४ कोटी ९३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकºयांना कर्जाचे वाटप करण्यात येत आहे. ११ सप्टेंबरपर्यंत १ लाख १ हजार २७४ शेतकºयांना ८०२ कोटी ८७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.- आलोक तारेनियाव्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक
मुदत १५ दिवसांवर; ४१ हजार शेतकऱ्यांना मिळाले नाही पीक कर्ज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 10:31 AM