१८७ जणांचे घेतले नमुने
विशेष मोहिमेंतर्गत बुधवारी गांधी रोड, खुले नाट्यगृह रोड यासह गर्दीच्या ठिकाणातील जवळपास १८७ फेरीवाल्यांचे नमुने संकलित करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. या चाचणी अहवालाकडे प्रशासनाचे लक्ष आहे. यासह लोकांशी जास्त संपर्कात येणाऱ्या इतरही घटकांमधील व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
खबरदारीचे आवाहन
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेला दुसऱ्या लाटेचा इशारा आणि दिवाळीनंतर झपाट्याने होणारी रुग्णसंख्या वाढ लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले. नागरिकांनी नियमीत मास्क, इतरांपासून सुरक्षीत अंतर आणि वारंवार हात धुण्याचेही आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
कोरोनाचा संभाव्य धोका पाहता जिल्हा प्रशासन आणि आराेग्य विभाग सतर्क आहे. त्या अनुषंगाने विशेष मोहीम राबवित बुधवारी शहरातील फेरीवाल्यांचे नमुने संकलीत केले आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक,अकोला.