पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना दिवसा बारा तास तर पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना रात्री आठ तास वीज पुरवठा केला जात आहे. जीवघेण्या थंडीत रात्री अपरात्री शेतात जाऊन पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांसाठी धाेकादायक ठरत आहे. रात्री शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवाला हिंस्त्र पशु, साप, विंचू यांच्यापासून धाेका निर्माण झाला आहे.
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी सोमवारी महावितरण कार्यालयावर 'रूमने मोर्चा'चे आयोजन केले होते. शिवसेनेचे पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख तथा खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. महावितरण कार्यालयावर सेनेचा माेर्चा धडकणार असल्यामुळे पाेलीस यंत्रणा, जिल्हा प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्या.