------------
अखेर उमरा येथे आरोग्य तपासणी सुरू; १६५ कुटुंबाची तपासणी
उमरा: गावात डेंग्यूसदृश तापाची साथ सुरू असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच त्याची दखल घेऊन आरोग्य विभागाने गावातील १६५ कुटुंबाची तपासणी केली.
गावात घाणीचे साम्राज्य पसरल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे गावात डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण वाढले आहेत. याबाबत ‘लोकमत’ने ७ सप्टेंबर रोजी लोकमतने वृत्त प्रकाशित करताच आरोग्य विभागाकडून दखल घेऊन वैद्यकीय अधिकारी डॉ. शारदा भिरडे यांच्या मार्गदर्शनात सीएचओ जावकर, घुंगरे, एस. के. वानखेडे, पी. बी. चापके, सी. डी. अंबळकार, आशा सेविका छाया धोडेकर, आशा तायडे, सुनीता चिंचोळकार, वर्षा मावलकर यांनी दि. ८ सप्टेंबर रोजी सर्वेक्षण करून तपासणी केली.
-----------------------------
येथे दहा डेंग्यूसदृश तापाची लागण झाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गावांमध्ये सर्व्हे सुरू आहे. रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. ग्रामपंचायतीला फवारणीसाठी औषधे उपलब्ध करून दिली.
- डॉ. शारदा भिरडे, वैद्यकीय अधिकारी