शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
3
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
4
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
5
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
6
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
7
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
8
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
9
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
10
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
11
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
12
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
13
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
14
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
15
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
16
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
17
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
18
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

20 मजुरांना घेऊन जाणारी क्रुझर पलटली; सुदैवाने बचावले कामगार

By atul.jaiswal | Published: October 15, 2022 9:02 AM

सोयाबीन सोंगणीचा हंगाम असल्याने मध्यप्रदेशातील दुर्मिळ भागातून शेकडो मजूर या कामासाठी विदर्भात दाखल होतात

मूर्तिजापूर (जि. अकोला) : मध्ये प्रदेशातून वाशीम जिल्ह्य़ातील धनज, कामरगाव येथे मजूर घेऊन जात असलेल्या चारचाकी वाहनाला आपघात होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्यात जाऊन उलटल्याची घटना १५ ऑक्टोबर रोजी पहाटे ४:३० वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान मूर्तिजापूर - दर्यापूर रोडवरील सिरसो प्लॉटजवळ हा भीषण अपघात झाला. दैव बलवत्तर म्हणून २० मजूर सुखरूप बचावले.   

सोयाबीन सोंगणीचा हंगाम असल्याने मध्यप्रदेशातील दुर्मिळ भागातून शेकडो मजूर या कामासाठी विदर्भात दाखल होतात, शनिवारी पहाटे या मजुरांनी खचाखच भरलेली कृझर चारचाकी वाहन क्रमांक एमपी ०४ बीसी ६४७१ हे मूर्तिजापूरच्या दिशेने भरधाव येत असताना समोरचे चाक तुटून पडल्याने रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या चारचाकी वाहनात लहानमोठे २० च्यावर मजूर बसून असल्याची माहिती आहे. भरधाव वाहन खोल खड्ड्यात जाऊन उलटले असताना देखील कोणालाही इजा झाली नाही. दैव बलवत्तर म्हणून सर्व मजूर सुखरूप बचावले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. 

टॅग्स :AccidentअपघातAkolaअकोलाLabourकामगार