अकोला : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शुक्रवारी पालकमंत्री कार्यालय सुरू करण्यात आले. महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पालकमंत्री कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरिश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी आदी उपस्थित होते. या कार्यालयाचे नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांच्यासह आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे.तक्रारींच्या निवारणासाठी कार्यालय महत्वाचे ठरेल!
जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण होण्यासाठी व आवश्यक विकासकामांना चालना मिळण्यासाठी हे कार्यालय महत्वाचे ठरेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. पालकमंत्री कार्यालयात स्वतंत्र वॉररूम स्थापित करण्यात आली असून त्याद्वारे प्रशासनाच्या कामकाजाचा नियमित आढावा घेतला जाणार आहे.