अकाेला : आकाेट ग्रामीण पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील रहीवासी असलेली एक मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पाेलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. यानंतर अनैतीक मानवी वाहतूक नियंत्रण कक्षाने या मुलीचा मुंबइतील नेरुळ परिसरात शाेध लावला. या मुलीवर उपचार सुरु असतांनाच तीला तीच्या आइच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
आकाेट तालुक्यातील एक मुलगी बेपत्ता झाल्यानंतर आकाेट ग्रामीण पाेलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ३६३ अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरु केला असता मुलीचा कुठेही शाेध लागला नाही. या प्रकरणाचा समांतर तपास अनैतीक मानवी वाहतुक नियंत्रण कक्षानेही सुरु केल्यानंतर त्यांना ही मुलगी मुबइत असल्याची माहीती मीळाली. यावरुन मुंबइ गाठून नेरुळ पाेलिसांना साेबत घेउन स्व. मीनाताइ ठाकरे हाॅस्पीटलमधून मुलीचा शाेध लावला. त्यानंतर पिडीत मुलील तीच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले.
नेरुळ पाेलिसांच्या मदतीने या मुलीला घेउन जाणाऱ्या आराेपीचा शाेध घेतला असता त्यालाही कक्षाने ताब्यात घेतले. त्यानंतर आराेपीस आकाेट ग्रामीण पाेलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाइ पाेलिस अधीक्षक संदीप घुगे, अपर पाेलिस अधीक्षक अभय डाेंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय खर्चे, सुरज मंगरूळकर, धनराज चव्हाण, पुनम बचे, अरविंद खाेेडे, विजय कबले, राजकन्या अंजाळे यांनी केली.
अपहरण झालेल्या १०३ मुलींचा लावला शाेधशहरासह जिल्हयाच्या विविध भागातून बेपत्ता झालेल्या तसेच अपहरणाचा गुन्हा दाखल असलेल्या १०३ मुलींसह महिलांचा अनैतीक मानवी वाहतुक कक्षाने गत सहा महीन्यांच्या कालावधीत शाेध लावला आहे. यामध्ये ३३ बेपत्ता मुलींचा समाेवश असून ७० प्रकरणांमध्ये अपहरणाचे गुन्हे पाेलिसांनी दाखल केले हाेते.