काँग्रेसमध्ये सामान्यांना न्याय मिळत असल्याचा संदेश - डॉ. सुधीर ढोणे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2022 12:21 PM2022-03-21T12:21:11+5:302022-03-21T12:21:18+5:30

Congress : युवकांना न्याय मिळत असल्याचा संदेश जनतेत गेल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी केले आहे.

The message that the common man is getting justice in the Congress - Dr. Sudhir Dhone | काँग्रेसमध्ये सामान्यांना न्याय मिळत असल्याचा संदेश - डॉ. सुधीर ढोणे 

काँग्रेसमध्ये सामान्यांना न्याय मिळत असल्याचा संदेश - डॉ. सुधीर ढोणे 

googlenewsNext

अकोला जिल्हा युवक काँग्रेसच्या निवडणुकीत १४८५४ मते मिळवून अकोट येथील निनाद मानकर विजयी झाले आहेत. निनाद मानकर यांच्यामागे मोठा राजकीय वारसा नसुन सर्वसामान्य कुटुंबातील युवक निवडणुकीद्वारे युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदावर निवडून आल्याने काँग्रेसमध्ये सर्वसामान्य जनतेला, युवकांना न्याय मिळत असल्याचा संदेश जनतेत गेल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी केले आहे. युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल निनाद मानकर यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. सुधीर ढोणे बोलत होते.

राहुल गांधी यांच्या संकल्पनेनुसार युवकांच्या संघटनासाठी लोकशाही पद्धतीने युवक काँग्रेसची पक्षातंर्गत निवडणुक घेण्यात आली होती. दि. १२ नोंव्हेंबर ते १२  डिसेंबर २०२१ या कालावधीत वुईथ आयवायसी या भारतीय युवक काँग्रेसच्या मोबाईल अॅपद्वारे अप्रत्यक्षरीत्या ऑनलाईन मतदान घेण्यात आले होते. लोकशाही पद्धतीने घेतलेल्या मतदान प्रक्रीयेत जिल्ह्यातील युवकांनी उत्स्फुर्त पद्धतीने मतदान केले होते. या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. निनाद मानकर यांच्या विजयाबद्दल आयोजित करण्यात आलेल्या सत्कार कार्यक्रमात अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष भुषण ताले पाटील, कुणाल जोध, प्रतीक गोरे, चेतन गुरेकार, महेश वाघ, अमोल कविटकर, विशाल इंगळे, अक्षय रायबोले, राहूल साठे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: The message that the common man is getting justice in the Congress - Dr. Sudhir Dhone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.