अकोला जिल्हा युवक काँग्रेसच्या निवडणुकीत १४८५४ मते मिळवून अकोट येथील निनाद मानकर विजयी झाले आहेत. निनाद मानकर यांच्यामागे मोठा राजकीय वारसा नसुन सर्वसामान्य कुटुंबातील युवक निवडणुकीद्वारे युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदावर निवडून आल्याने काँग्रेसमध्ये सर्वसामान्य जनतेला, युवकांना न्याय मिळत असल्याचा संदेश जनतेत गेल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी केले आहे. युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल निनाद मानकर यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. सुधीर ढोणे बोलत होते.
राहुल गांधी यांच्या संकल्पनेनुसार युवकांच्या संघटनासाठी लोकशाही पद्धतीने युवक काँग्रेसची पक्षातंर्गत निवडणुक घेण्यात आली होती. दि. १२ नोंव्हेंबर ते १२ डिसेंबर २०२१ या कालावधीत वुईथ आयवायसी या भारतीय युवक काँग्रेसच्या मोबाईल अॅपद्वारे अप्रत्यक्षरीत्या ऑनलाईन मतदान घेण्यात आले होते. लोकशाही पद्धतीने घेतलेल्या मतदान प्रक्रीयेत जिल्ह्यातील युवकांनी उत्स्फुर्त पद्धतीने मतदान केले होते. या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. निनाद मानकर यांच्या विजयाबद्दल आयोजित करण्यात आलेल्या सत्कार कार्यक्रमात अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष भुषण ताले पाटील, कुणाल जोध, प्रतीक गोरे, चेतन गुरेकार, महेश वाघ, अमोल कविटकर, विशाल इंगळे, अक्षय रायबोले, राहूल साठे आदी पदाधिकारी उपस्थित होते.