अकोला : खदान पोलिस स्टेशन हद्दीतील अल्पवयीन मुलीचे नको त्या अवस्थेतील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत या मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या दोद्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपीमध्ये सादील शाह लतिफ शाह व एका महिलेचा समावेश आहे. पीडिता एकटी घरी हजर असताना आरोपीने फिर्यादीच्या घरात घुसून फिर्यादीचे मोबाइलमध्ये फोटो काढले व तिचा विनयभंग केला. तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
बदनामी करण्याची धमकी देऊन जबरदस्तीने खोलीमध्ये बंद करून बाहेर निघून गेले. त्यावेळी आरोपीने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. याबाबत काहीही सांगितल्यास बदनामी करण्याची धमकी दिली. दोन महिन्यानंतर पीडितेची मोठी बहीण घरी आली असता, तिला सर्व प्रकार सांगितला. परंतु, बदनामीच्या भीतीमुळे आई-वडिलांनी पीडितेला मोठ्या बहिणीसोबत बाहेरगावी पाठवून दिले. तर क्रमांक एक आरोपी शाह व आरोपी क्रमांक दोन खान याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली.
या प्रकरणी खदान पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सादिक शाह लतिफ शाह, अफरोज खान व आणखी एका महिलेविरूध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय सायरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक नीता दामधर करीत आहेत.