लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गोरक्षण रोडवरील विसपुते नामक इसमाच्या ज्वेलर्समधून १२ हजार रुपयांचे दागिने चोरणार्या तीन महिलांविरुद्ध खदान पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला. प्रमोद दत्तराय विसपुते यांचे गोरक्षण रोडवर ज्वेलर्सचे दुकान आहे. २ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास विसपुते यांचा पु तण्या शुभमने ज्वेलर्स दुकान उघडले. त्यानंतर या ज्वेलर्समध्ये तीन महिला दागिने खरेदीसाठी आल्या. त्यांनी ३५0 रुपये किम तीचे चांदीचे जोडवे खरेदी केले. त्यानंतर ३ ऑगस्ट रोजी सकाळी काका-पुतण्यांनी दुकानातील स्टॉक तपासला असता, जोडव्यांचे १८ जोड गायब असल्याचे आढळून आले. या जोडव्यांची किंमत १२ हजार रुपये आहे. त्यानंतर त्यांनी दुकानातील सीसी कॅमेर्यातील फुटेज पाहिले असता, यामध्ये ३ ऑगस्ट रोजी तीन महिलांनी जोडवे चोरल्याचे दिसून आले. या प्रकरणी विसपुते यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सदर महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ज्वेलर्समध्ये चोरीचा प्रयत्न; तीन महिला ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 2:21 AM
अकोला : गोरक्षण रोडवरील विसपुते नामक इसमाच्या ज्वेलर्समधून १२ हजार रुपयांचे दागिने चोरणार्या तीन महिलांविरुद्ध खदान पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला.
ठळक मुद्देप्रमोद दत्तराय विसपुते यांचे गोरक्षण रोडवर ज्वेलर्सचे दुकान दागिने चोरणार्या तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल