अकोला: एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या बीके चौक परिसरातील कार्तिक वाइन बारमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी करीत सुमारे चार लाख रुपयांचा दारूसाठा अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. ‘लाकडाउन’ सुरू केल्यानंतर वाइन बार बंद असल्याने दारुड्यांनीच ही चोरी केल्याची माहिती आहे. राज्य औद्योगिक वसाहत महामंडळाच्या वसाहतमधील फेज क्रमांक-३ मध्ये असलेल्या कार्तिक वाइन बार अॅण्ड रेस्टॉरंटमधील दारूसाठा कोरोनाच्या ‘लॉकडाउन’मुळे तसाच ठेवण्यात आला होता. दरम्यान, १४ एप्रिल रोजी अज्ञात चोरट्यांनी कार्तिक वाइन बार अॅण्ड रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करून या बारमधील तब्बल चार लाख रुपयांचा दारूसाठा लंपास केला. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच बार मालक यांनी बारमधील साठा पाहणी केली असता, तब्बल ४ लाख रुपयांची दारू अज्ञात चोरट्यांनी पळविल्याचे समोर आले. याप्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे; मात्र जिल्ह्यातील दारूसाठा चोरी केल्याची ही पहिलीच घटना असल्याची माहिती असून, पोलिसांनी आत या चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. एमआयडीसीचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.बारमधील चोऱ्यांमुळे आव्हानमद्यपींना दारू मिळत नसल्याने वाइन बार तसेच वाइन शॉप फोडून दारू व बिअर चोरी झाल्याच्या घटना राज्यभर घडलेल्या आहेत. यामध्ये आता अकोल्यातील एमआयडीसी परिसरातील वाइन बार फोडून चार लाख रुपयांचा दारूसाठा पळविल्याने पोलीस तसेच उत्पादन शुल्क विभागासमोर आव्हान उभे ठाकले आहे. या बारमधील साठा ‘सील’ केला असून, तो चोरी गेल्याने आता बार मालकासह सरकारी यंत्रणेची पंचाईत झाली आहे.
‘एमआयडीसी’तील वाइन बार फोडून चार लाखांची दारू पळविली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 9:50 AM