शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
2
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
3
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
4
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
5
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
6
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
7
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
8
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
9
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
10
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
11
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
12
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
13
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
14
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
15
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
17
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
18
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
19
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

मनपाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता मनोहर बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 4:01 PM

मनपाच्या बांधकाम विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता जयप्रकाश मनोहर यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी घेतला आहे.

ठळक मुद्देआवारभिंत बांधण्याचा कंत्राट मनपातील कंत्राटदार शोएब सोरटिया यांना दिला होता.कार्यकारी अभियंता राजेश श्रीवास्तव, उपअभियंता जयप्रकाश मनोहर, कनिष्ठ अभियंता घनश्याम उघडे व कंत्राटदार शोएब सोरटिया यांनी शासन निधीचा अपहार केल्याचे समोर आले.आस्थापनेवरील उपअभियंता तथा कार्यकारी अभियंता जयप्रकाश मनोहर यांच्या विभागीय चौकशीचा आदेश जारी केला.

- आशिष गावंडे

अकोला : बांधकामाचा कालावधी उलटून गेल्यावर केवळ कागदोपत्री आवारभिंत उभारून शासनाच्या ४ लाख ६९ हजार रुपयांवर ताव मारणाऱ्या मनपाच्या बांधकाम विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता जयप्रकाश मनोहर यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी घेतला आहे. मनपात आस्थापनेवर उपअभियंता म्हणून सेवारत असणाºया जयप्रकाश मनोहर यांचा बडतर्फीचा प्रस्ताव सभागृहाकडे सादर करण्यात आला आहे. प्रशासनाने मानसेवी उपअभियंता राजेश श्रीवास्तव यांची सेवा यापूर्वीच समाप्त केली आहे.कौलखेड परिसरात मनपाच्या मालकीच्या असलेल्या शिव उद्यानच्या जागेवर वृक्षारोपण करण्यासाठी उद्यानला आवारभिंत उभारण्याचे काम २०१२ मध्ये प्रस्तावित करण्यात आले होते. त्यासाठी सुवर्ण जयंती नगरोत्थानमधून ४ लाख ८७ हजार रुपये निधी मंजूर झाला होता. आवारभिंत बांधण्याचा कंत्राट मनपातील कंत्राटदार शोएब सोरटिया यांना दिला होता. या कामाचे अंदाजपत्रक जयप्रकाश मनोहर यांनी तयार केले होते. त्यावर तत्कालीन उपअभियंता व कार्यकारी अभियंता म्हणून राजेश श्रीवास्तव यांची स्वाक्षरी होती. १५ डिसेंबर २०१२ रोजी आवारभिंत बांधण्याचे कार्यादेश मिळाल्यानंतर कंत्राटदाराला १४ फेब्रुवारी २०१३ पर्यंत बांधकाम करण्याची अट नमूद होती. फेब्रुवारी २०१३ पर्यंत कागदोपत्री बांधकाम केल्यानंतर तत्कालीन कार्यकारी अभियंता राजेश श्रीवास्तव, उपअभियंता जयप्रकाश मनोहर, कनिष्ठ अभियंता घनश्याम उघडे व कंत्राटदार शोएब सोरटिया यांनी शासन निधीचा अपहार केल्याचे समोर आले. याप्रकरणी माजी उपमहापौर विनोद मापारी यांनी मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर अजय लहाने यांनी आवारभिंतीच्या कामाची चौकशी सुरू केली. प्रशासनाने चौकशी केल्यास सर्व जण अडकणार या भीतीपोटी संबंधित कंत्राटदार व मनपा कर्मचाºयांनी २३ मे २०१५ रोजी आवारभिंतीच्या बांधकामाला सुरुवात केली. सदरचे काम ५ डिसेंबर २०१५ रोजी पूर्ण करण्यात आले. तोपर्यंत फार उशीर झाला होता. तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी तडकाफडकी मानसेवी उपअभियंता राजेश श्रीवास्तव, कनिष्ठ अभियंता घनशाम उघडे यांची सेवा समाप्त केली. तसेच आस्थापनेवरील उपअभियंता तथा कार्यकारी अभियंता जयप्रकाश मनोहर यांच्या विभागीय चौकशीचा आदेश जारी केला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका