शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

...तर डॉक्टरांना नोकरीवरून काढून टाका -  राजेश टोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 10:17 AM

डॉक्टर उपस्थित राहत नसेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. पर्यायी नोकरीवरूनही काढण्याचा निर्णय घ्यावा, असे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लोकप्रतिनिधींच्या बैठकीत दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयातच प्रसूती व्हावी शिवाय प्रथमोपचारही होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉक्टरांची ही उपस्थिती अनिवार्य आहे. डॉक्टर उपस्थित राहत नसेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. पर्यायी नोकरीवरूनही काढण्याचा निर्णय घ्यावा, असे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लोकप्रतिनिधींच्या बैठकीत दिले.जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्यासोबत गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बैठक घेतली. बैठकीत लोकप्रतिनिधींनी रुग्ण सेवेच्या विविध समस्या उपस्थित करत चर्चा केली.दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामीण भागातच प्रसूती व्हावी तसेच इतर आजारांवर उपचारही ग्रामीण भागातच व्हावा या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयांची क्षमता वाढवण्याचे आव्हान लोकप्रतिनिधींनी केले. यावर बोलताना टोपे यांनी स्वच्छता तसेच डॉक्टरांच्या उपस्थितीसंदर्भात कठोर निर्णय घेण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले तसेच जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा वाढता आकडा चिंताजनक आहे.यावर नियंत्रणासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. बैठकीला आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार गोवर्धन शर्मा, हरीश पिंपळे, रणधीर सावरकर, अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी टोपे यांनी सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन समाधान करण्याचा प्रयत्न केला.

लोकप्रतिनिधींनी मांडली मतेआ. प्रकाश भारसाकळे यांनी अकोट येथील ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावावा, असे सांगितले. आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी सूचना केली की, संस्थागत अलगीकरणासाठी शासनाने खासगी हॉटेल्स, लॉजेस अधिग्रहित करून त्यात रुग्ण ठेवावेत. त्यासाठी रुग्णांना माफक दरात ही सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली. आ. रणधीर सावरकर यांनी खासगी रुग्णालयांत नॉन कोविड रुग्णांवर उपचार होत नाही, असे स्पष्ट करून खासगी रुग्णालयांची सेवा कोरोनाच्या उपचारासाठी घेण्यात यावी, अशी सूचना केली.आ. शर्मा यांनी बीएएमएस डॉक्टर्सचे वेतन लवकरात लवकर देऊन त्यांची सेवा घेण्यात यावी, अशी सूचना त्यांनी मांडली. आ. पिंपळे यांनी मूर्तिजापूर येथील घटनेस जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याची मागणी केली. आ. नितीन देशमुख यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट करा. ग्रामीण भागात डॉक्टर्स उपलब्ध नसतात. त्यामुळे गरोदर मातांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, अशी तक्रार केली. जि.प. अध्यक्ष सविता भोजने, आ. अमोल मिटकरी यांनीही सूचना केल्यात.

हॉटेल्स रूम ३० टक्के दराने उपलब्ध करून द्यावे.ज्या रुग्णांना लक्षण नाहीत, अशा रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर क्वारंटीन करणे आवश्यक आहे.ज्या रुग्णांना संस्थागत क्वारंटीनमध्ये राहण्याची इच्छा नाही, अशा रुग्णांसाठी ३० टक्के दरामध्ये हॉटेल्स उपलब्ध करून द्यावे, यासाठी येणारा खर्च हा रुग्णांनी द्यावा, असेही यावेळी त्यांनी म्हटले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRajesh Topeराजेश टोपेAkolaअकोलाdoctorडॉक्टर