लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: कोरोनामुक्त असलेल्या आणि पुढेही कोरोनामुक्त राखण्याची खात्री देणाऱ्या गावांत शाळा सुरू करण्याची शक्यता पडताळण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यातील ७४७ गावे कोरोनामुक्त असून, शिक्षण विभागाची तयारी असल्यास बहुतांश गावांत पाचवी ते दहावीपर्यंतच्या शाळा सुरू होण्याची शक्यता आहे.
मागील काही महिन्यांपासून जी गावे कोरोनामुक्त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील, अशा गावांतील इयत्ता दहावी, बारावीचे वर्ग सुरू करता येतील का, याची शक्यता विभागाने तपासून पाहावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत यावर चर्चा झाली आहे. जिल्ह्यातील ७४७ गावे २६ जूनपर्यंतच्या अहवालानुसार, कोरोनामुक्त असून, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार यातील जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्त आहेत आणि भविष्यात ही गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठीच्या उपाययोजनांचे कडक पालन करत गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील, अशा गावांतील शाळा सुरू करण्याबाबत पडताळणी होेऊ शकते, परंतु राज्य शासनाच्या नव्या आदेशानुसार, जिल्ह्यातही सोमवारपासून नव्याने निर्बंध लागणार असून, यात शैक्षणिक संस्थाही बंद ठेवण्यात येणार आहेत.
------------------------------