लोकमत न्यूज नेटवर्कपिंजर : पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या पातूर नंदापूर येथे १५ आॅगस्टला स्वातंत्र्यदिनी घेण्यात आलेल्या ग्रामसभेमध्ये तंटामुक्ती समिती अध्यक्षाच्या निवडीवरुन वाद झाला. यामुळे तेथील महिला सरपंचांचे पती व राष्ट्रवादीच्या पदाधिकाºयांनी परस्परा विरोधात पिंजर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल केल्या. त्यावरून पिंजर पोलिसांनी दोघाजणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निलेश अव्हाळे यांनी पो.स्टे. ला दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांनी तंटामुक्ती ग्राम समितीचा अध्यक्ष हा जनतेतून निवडण्याची सूचना केली. परंतु महिला सरपंचांचे पती भगवंत दौलत गवळी यांनी त्यास विरोध करुन माझ्या मताने अध्यक्ष होणार असे म्हणून लाथांनी मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार दाखल केली. याचप्रकरणी महिला सरपंचांचे पती भगवंत गवळी यांनी ते भाषणाकरिता ग्रामसभेत उभे राहिले असता निलेश अव्हाळे यांनी जुन्या वादातून मारहाण केली अशी तक्रार दाखल केली. या परस्परविरोधातील तक्रारीवरून दोघांविरुद्ध कलम ३२३, ५0४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पातूर नंदापूर येथे ग्रामसभेत दोन जणांमध्ये वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 7:37 PM
लोकमत न्यूज नेटवर्कपिंजर : पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या पातूर नंदापूर येथे १५ आॅगस्टला स्वातंत्र्यदिनी घेण्यात आलेल्या ग्रामसभेमध्ये तंटामुक्ती समिती अध्यक्षाच्या निवडीवरुन वाद झाला. यामुळे तेथील महिला सरपंचांचे पती व राष्ट्रवादीच्या पदाधिकाºयांनी परस्परा विरोधात पिंजर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल केल्या. त्यावरून पिंजर पोलिसांनी दोघाजणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.राष्ट्रवादी ...
ठळक मुद्देपिंजर पोलीस स्टेशनमध्ये परस्परा विरोधात तक्रारी पोलिसांनी दोघांविरुद्ध केला गुन्हा दाखल