व्यावसायिक म्हणतात...
पितृपक्षामध्ये नागरिक खरेदीसाठी टाळाटाळ करायचे; परंतु आता उलट खरेदीकडे ओढा वाढला आहे. बहुतांश नागरिकांमध्ये परिवर्तन झाले आहे. गर्दी कमी असल्याने पसंतीची वस्तू घेता येते आणि दरातही कमतरता राहते.
- शैलेश खरोटे, सराफा व्यावसायिक
आधी पितृपक्षात खरेदी टाळत होते. आता बहुतांश नागरिक पितृपक्षातही खरेदी करतात. या काळात काही प्रमाणात खरेदीचे प्रमाण कमी होते. यंदा गणोशोत्सवादरम्यानही ग्राहकांचे प्रमाण कमी दिसून आले.
- श्रीराम मित्तल, इलेक्ट्रॉनिक्स व्यावसायिक
पितृपक्षात व्यावसायिक नवीन मालाची खरेदी करतात. नवरात्रात नवीन माल येणार असल्याने या दृष्टिकोनातूनही बहुतांश लोक खरेदी टाळतात; मात्र दैनंदिन लागणाऱ्या कपड्यांची या काळात खरेदी सुरूच असते.
- गौतम भैया, साडी व्यावसायिक
गणेशोत्सवात ग्राहक दुचाकींची खरेदी कमी प्रमाणात करतात. नवरात्रौत्सवात प्रतिसाद चांगला असतो. आधी पितृपक्षात खरेदी होत नव्हती. आता काळ बदलत असून, पैसे असल्याने पितृपक्षातही ग्राहक दुचाकींची खरेदी करतात.
- किशोर भट्टड, ऑटोमोबाइल व्यावसायिक
पितृपक्षात अनेकजण खरेदी निषिद्ध मानतात. त्यामुळे या काळात क्वचितच लोक दुचाकीची खरेदी करतात. या दिवसांमध्ये ग्राहकांकडून प्रतिसाद कमी राहतो. नवरात्रपासून ऑटोमोबाइल व्यवसायला चालना मिळते.
- चेतन व्यास, ऑटोमोबाइल व्यावसायिक