अकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे विद्यार्थी, पालक व शिक्षकांशी संवाद साधणार होते. यासाठी शिक्षण विभागाने उपक्रमशील शाळांची निवड केली, विद्यार्थ्यांनाही तयार केले मात्र ऐनवेळी विद्यार्थ्यांना आणू नका, असा निरोप आला अन् शिक्षकांना ह्यव्हीसीह्णमध्ये बोलावूनही शिक्षकांसोबत संवाद झाला नसल्याने शिक्षकांसह विद्यार्थ्यांचाही हिरमोड झाला.२७ जून रोजी राज्यात शाळेच्या यावर्षीच्या सत्राला प्रारंभ होत असल्याने खुद्द मुख्यमंत्री राज्यातील पाच शाळांमधील विद्यार्थी, पालक, शिक्षणाधिकार्यांशी संवाद साधणार होते. यामध्ये अकोला जिल्ह्यातील ब्र१ी खुर्द येथील शाळेची निवड करण्यात आली होती. शिक्षण विभागाकडून शाळांना निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार निवडलेल्या शाळांमधील पाच विद्यार्थी, यामध्ये तीन मुले व दोन मुली त्यांचे प्रत्येकी एक पालक, शाळेतील सर्व शिक्षक यांनी तयारी केली होती. रविवारी संध्याकाळी संबंधित शाळेच्या शिक्षकांना, विद्यार्थ्यांना ह्यव्हीसीह्णसाठी आणू नये, असा निरोप गेला, तर सोमवारी सकाळी पालकांसोबतही संवाद साधता येणार नाही, केवळ शिक्षक व मुख्याध्यापकांनी ह्यव्हीसीह्णसाठी येण्याची सूचना आली. त्यानुसार अकोल्यातील जळगाव नाहटा येथील शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक आर.एस. कापसे व ब्र१ी खुर्द शाळेचे शिक्षक यू.एच. सराळे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात हजर होण्याच्या सूचना दिल्या. प्रत्यक्षात ह्यव्हीसीह्ण सुरू झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे इतर विभागांचा आढावा घेणे सुरू केले. त्यामुळे शिक्षण विभागाचा क्रमांक आठवा लागला. त्यानंतर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी व शिक्षणाधिकार्यांनीच माहिती दिली व शिक्षकांना बोलण्याची संधीही मिळाली नाही
मुख्यमंत्र्यांशी संवाद झालाच नाही!
By admin | Published: June 28, 2016 2:25 AM