अकोला : प्लास्टिक व थर्माकॉलपासून तयार होणाऱ्या अविघटनशील वस्तूंच्या अमर्यादित वापरामुळे पर्यावरणाचा ºहास होत असल्याचे चित्र समोर येताच राज्य शासनाने प्लास्टिक पिशव्यांसह विविध वस्तूंवर बंदीचा निर्णय घेतला. दंड वसूल करणे हा महापालिकेचा उद्देश नसून, शहर प्लास्टिकमुक्त होणे गरजेचे असल्याचे महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सांगितले. प्लास्टिक बंदीच्या मुद्यावर गुरुवारी जिल्हानियोजन भवन येथे आयोजित कार्यशाळेत महापौर विजय अग्रवाल, आयुक्त जितेंद्र वाघ, पर्यावरण तज्ज्ञ नंदकुमार गांधी यांनी अकोलेकरांना मार्गदर्शन केले.कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महापौर विजय अग्रवाल होते. मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, उप महापौर वैशाली शेळके, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले व प्रकल्प अधिकारी नगर पालिका प्रशासन अतुल दौड यांची प्रमुख उपस्थिती होती. प्लास्टिक बंदीवर अमरावती येथील पर्यावरण तज्ज्ञ नंदकुमार गांधी यांनी प्रकाशझोत टाकला. प्लास्टिक व थर्माकॉलपासून तयार केल्या जाणाºया वस्तूंची यादी, बंदी घातलेल्या वस्तू व वापरात असणाºया वस्तूंविषयी नंदकुमार गांधी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यशाळेला मनपा पदाधिकारी, सर्वपक्षीय नगरसेवक, विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सचे पदाधिकारी, व्यापारी, विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, महिला बचत गटांची उपस्थिती होती.प्लास्टिक पिशव्यांचा साठा जमा करा!शहरातील रेडीमेड कापड व्यावसायिक, विविध वस्तूंची विक्री करणारे व्यावसायिक आजही प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर करीत आहेत. शहरात ‘नॉन वोवन पॉलीप्रापिलीन’ पिशव्या तयार करणारे किरकोळ उत्पादक आहेत. त्यांच्याकडे पिशव्यांचा साठा असेल, तर मनपाच्या खोलेश्वरस्थित मोटर वाहन विभागामध्ये उघडण्यात आलेल्या कक्षात जमा करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी केले आहे.शहर प्लास्टिकमुक्तीसाठी सहकार्याची गरज!विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सच्या पदाधिकाºयांसह शहरात प्लास्टिक पिशव्या, वस्तू तयार करणाºया व्यावसायिकांनी बंदी घातलेल्या वस्तूंचे उत्पादन थांबवण्याचे आवाहन महापौर विजय अग्रवाल यांनी केले. व्यावसायिक, उत्पादकांना माहिती देण्यासाठी होर्डिंग, जाहिरातींचा वापर करण्याची गरज असल्याचे नमूद करीत शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचे महापौर विजय अग्रवाल यांनी स्पष्ट केले.