अकोला : जिल्ह्यात १५ लाख ६७ हजार ८०० मतदार असून, त्यापैकी ६८ हजार ८२५ मतदारांचे मतदार यादीत छायाचित्रच नाही. मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांची छायाचित्रे संकलित करण्याची मोहीम प्रशासनामार्फत राबविण्यात येत आहे. त्यामध्ये छायाचित्र सादर न करणाऱ्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे.
मतदार यादीत मतदारांच्या नावासमोर मतदारांचे छायाचित्र असणे आवश्यक आहे. छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत. अकोला जिल्ह्यातील मतदार अंतिम मतदार १५ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाच विधानसभा मतदारसंघांत १५ लाख ६७ हजार ८०० मतदार आहेत. त्यामध्ये ७ लाख ५९ हजार ५४ महिला मतदार व ८ लाख ८ हजार ७२१ पुरुष मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील १५ लाख ६७ हजार ८०० मतदारांपैकी ६८ हजार ८२५ मतदारांचे मतदार यादीत छायाचित्रच नाहीत. त्यानुषंगाने मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांची छायाचित्रे संकलित करण्याची मोहीम जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेत छायाचित्र सादर न करणाऱ्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनामार्फत निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे.
जिल्ह्यात एकूण १५ लाख ६७ हजार ८०० मतदार आहेत. मतदार यादीत छायाचत्रित नसलेल्या मतदारांची छायाचित्रे संकलित करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये छायाचित्र सादर करणाऱ्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणार आहे.
-संजय खडसे,
निवासी उपजिल्हाधिकारी