अकोला : जिल्ह्यातील खासगी कोविड रुग्णालयांमध्ये ‘कोविड’ रुग्णांवर उपचारासाठी शासनाकडून निश्चित करण्यात आलेल्या दरानुसार पैशाची आकारणी करण्यात येते की नाही, यासंदर्भात अंकेक्षण (आॅडिट) करण्यात येणार आहे. त्यासाठी पाच लेखाधिकाºयांची ‘आॅडिटर’ म्हणून नेमणूक करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी दिला.जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधीत रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, अकोला शहरातील सहा आणि मूर्तिजापूर येथील एक अशा सात खासगी रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांवर उपचाराची सुविधा सुरू करण्यात आली आहे; परंतु जिल्ह्यातील खासगी कोविड रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांवर उपचारासाठी जादा दराने पैसे घेण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे खासगी कोविड रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांवर उपचारासाठी शासनामार्फत निश्चित करण्यात आलेल्या दरानुसार पैशाची आकारणी करण्यात येत आहे की नाही, रुग्णांवर उपचारासाठी निश्चित करण्यात आलेल्या दरापेक्षा जास्त दराने पैशाची आकारणी करण्यात येत आहे काय, यासंदर्भात जिल्हा प्रशासनामार्फत ‘आॅडिट’ करण्यात येणार आहे. त्यासाठी पाच लेखाधिकाºयांची आॅडिटर म्हणून नेमणूक करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी २१ सप्टेंबर रोजी दिला. त्यानुसार नियुक्त करण्यात आलेल्या आॅडिटरकडून जिल्ह्यातील खासगी कोविड रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उपचारासाठी निश्चित करण्यात आलेल्या दरानुसार पैशाची आकारणी होते की नाही आणि निश्चित दरापेक्षा जादा दराने पैसे घेण्यात येतात काय, यासंदर्भात तपासणीचे काम सुरू करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील खासगी कोविड रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांवर उपचारासाठी शासनाकडून निश्चित करण्यात आलेल्या दरानुसार पैशाची आकारणी होत आहे की नाही, जादा दराने पैसे घेण्यात येतात काय, यासंदर्भात आॅडिट करण्यात येणार आहे. त्यासाठी पाच लेखाधिकाºयांची आॅडिटर म्हणून नेमणूक करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी दिला आहे.- संजय खडसेनिवासी उपजिल्हाधिकारी