लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी शहरातील ठाणेदारांची बैठक घेऊन वाढत्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यास बजावले होते; परंतु गत काही दिवसांपासून शहरात चोरटे धुमाकूळ घालत आहेत. सोमवारी रात्री चोरट्यांनी उमरी तील गोगटे ज्वेलर्स फोडून ४२ हजार रुपयांचे सोने व चांदीचे दागिने लंपास केले. दुसरी घटना खदान पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या अंबिका नगरात घडली. चोरट्यांनी अंबिका नगरात घरफोडी करून १ लाख ४0 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. मोठी उमरीतील भगीरथ नगरात राहणारे अमोल रमेश गोगटे यांचे उमरी रोडवर ज्वेलर्सचे दुकान आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे लोखंडी शटर वाकवून आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि दुकाना तील लोखंडी तिजोरी घेऊन चोरटे पसार झाले. तिजोरीमध्ये चांदीचे दागिने होते. या दागिन्यांची किंमत ४२ हजार रुपये आहे. सिव्हिल लाइन पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांना ज्वेलर्समधील तिजोरी पातूर ते मेडशी मार्गावरील एका पुलाखाली फेकल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी ही तिजोरी जप्त केली. घरफोडीची दुसरी घटना अंबिका नगरातील आशिष नारायण कांबळे यांच्या घरी घडली. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी कांबळे यांच्या घराच्या दुसर्या मजल्यावरील बेडरूममध्ये प्रवेश करून कपाटा तील सोन्याचे दागिने लंपास केले. या सोन्याची दागिन्यांची किंम त १ लाख ४0 हजार रुपये आहे. चोरट्यांनी कांबळे यांची घरासमोर उभी असलेली दुचाकीसुद्धा चोरून नेली. खदान पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
चोरट्यांचा धुमाकूळ; सराफा दुकानासह घर फोडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 1:52 AM
अकोला: पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी शहरातील ठाणेदारांची बैठक घेऊन वाढत्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यास बजावले होते; परंतु गत काही दिवसांपासून शहरात चोरटे धुमाकूळ घालत आहेत. सोमवारी रात्री चोरट्यांनी उमरी तील गोगटे ज्वेलर्स फोडून ४२ हजार रुपयांचे सोने व चांदीचे दागिने लंपास केले.
ठळक मुद्देदोन लाखांचा ऐवज लंपासदिवाळीपूर्वीच दिवाळे