अकोला, दि. १0- गेली पाच वर्षे एकाच सभागृहात बसणारे आज रोजी निवडणुकीच्या आखाड्यात आमने-सामने दंड थोपटून उभे आहेत. प्रभाग क्रमांक ५ मध्ये महापालिकेच्या स्थायी समितीचे विद्यमान सभापती विजय अग्रवाल यांच्यासह शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी रणधुमाळीचा शंख फुंकला आहे.महापालिकेची चौथी सार्वत्रिक निवडणूक विविध कारणांनी अविस्मरणीय ठरणार आहे. यंदा मनपाची हद्दवाढ होऊन नवीन प्रभागांची निर्मिती झाली. तसेच यावेळी पहिल्यांदाच सर्वच राजकीय पक्ष एकमेकांना आव्हान देत मैदानात उतरले आहेत. राजकीय पक्षात रंगलेल्या अंतर्गत कलहातून अनेकांनी पक्षांतर केले. भाजपच्या वतीने विद्यमान नगरसेवक तथा स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी प्रभाग ५ (ड प्रवर्ग) मधून दावेदारी केली आहे. २0१२ च्या निवडणुकीत भाजपच्या वतीने निवडणूक लढवणार्या नगरसेविका नम्रता मोहोड यांनी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे पती मनीष मोहोड हे शिवसेनेकडून उमेदवार आहेत. काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते कपिल रावदेव, तसेच राष्ट्रवादीच्या वतीने अमित ठाकरे यांनीदेखील ह्यडह्ण प्रवर्गातून उमेदवारी दाखल केली आहे. ह्यअह्ण प्रवर्गासाठी भाजपचे सुभाष खंडारे, सेनेचे मनीष चिमणकर, राकाँचे शैलेश बोदडे यांनी तर ह्यबह्ण प्रवर्गातून भाजपच्या वतीने जयंत मसने यांच्या सुविद्य पत्नी अर्चना मसने, शिवसेनेच्या शीतल पागृत निवडणूक रिंगणात आहेत. काँग्रेसच्या वतीने माजी नगरसेविका पुष्पा गुलवाडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ह्यकह्ण प्रवर्गासाठी भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते प्रशांत अवचार यांच्या सुविद्य पत्नी रश्मी अवचार, राकाँच्या चेतना ठाकरे, सेनेच्या वतीने मंजूषा हिवराळे तर काँग्रेसच्या वतीने सविता कावरे रणांगणात आहेत.
प्रभाग ५ मध्ये रंगणार काँटे की टक्कर!
By admin | Published: February 11, 2017 2:29 AM